

पुणे : पुढारी वृत्तसेवा : धायरी येथील रायकर मळा, खंडोबा मंदिराजवळ असणारया शेत तळ्यामधे आज सकाळी 09:53 वाजता दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरज शरद सातपुते, (वय 14) आणि पुष्कर गणेश दातखिंडे, (वय 13) दोघे ही राहणार धायरी, (नालंदा हायस्कुल शेजारी) अशी या मुलांची नावे आहेत.
शेत तळ्यामधे मुले बुडाल्याची वर्दी दलाच्या नियंत्रण कक्षास मिळताच तातडीने सिंहगड अग्निशमन केंद्र व पीएमआरडीए अग्निशमन केंद्र येथून दोन वाहने रवाना करण्यात आली होती. अग्निशमन वाहने पोहोचताच गळाच्या साह्याने 14 मिनिटात दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोटच्या मुलांच्या मृत्यूमुळे घरच्यांना जबर धक्का बसला आहे.