ANI Twitter Locked | ट्विटरने ANI चे अकाउंट केले लॉक, जाणून घ्या कारण

ANI Twitter Locked | ट्विटरने ANI चे अकाउंट केले लॉक, जाणून घ्या कारण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : देशातील प्रमुख वृत्तसंस्था असलेल्या एशियन न्यूज इंटरनॅशनल (Asian News International) चे ट्विटर अकाउंट लॉक झाले आहे. ट्विटरने शनिवारी दुपारी अचानक @ANI हँडल लॉक केले. या अकाउंटवर गेल्यास This account doesn't exist असा मेसेज येत आहे. (Twitter locked ANI news agency Account)

ANI च्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्विट करत ट्विटरने ANI चे अकाउंट लॉक केल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे ट्विट एलन मस्क यांना टॅग केले आहे. ७६ लाख फॉलोअर्स असलेल्या देशातील मोठ्या वृत्तसंस्थेचे ट्विटर अकाउंट लॉक झाले आहे. आमची गोल्ड टिक काढून घेण्यात आली आहे. नंतर ते ब्लू टिकने बदलले आणि अकाउंट लॉक झाले आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

@ANI ट्विटर अकाउंट पुन्हा सुरळीत होत नाही तोपर्यंत बातम्यांसंदर्भातील ट्विट @ani_digital आणि @AHindinews या हँडलवर करु, असे स्मिता प्रकाश यांनी सांगितले आहे. (Twitter locked ANI news agency Account)

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news