Twitter Down : ट्विटर पुन्हा डाऊन; सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

Twitter Down
Twitter Down
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter Down : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर पुन्हा डाऊन झाल्याने हजारो यूजर्सना ट्विटर वापरण्यासाठी अडचणी येत आहे. शनिवारी संध्याकाळी देखील ट्विटर संपूर्ण जगभर डाऊन झाले होते. आज रविवारी देखील ही समस्या येत आहे. गेल्या तासभरापेक्षा जास्त काळापासून भारतासह जगभरात ट्विटर डाऊन झाले आहे. ट्विटर यूजर्सना अॅप खोलण्यात अडचणी येत आहेत. तसेच वेब व्हर्जनदेखील ठप्प आहे.

ट्विटर उघडल्यानंतर यूजर्सला Can Not Retrieve Tweets असा एरर दाखवत आहे किंवा Something Went Wrong किंवा Rate Limit Exceeded चा मेसेज दिसत आहे. तर काहींना Retry म्हणूनही मेसेज दाखवत आहे. तसेच अनेक जणांना ट्विटरला डाउनची तक्रार देखील करता येत नाही आहे. Twitter Down

Twitter Down
Twitter Down

डाउन डिटेक्टरनुनसार, जवळपास 4000 यूजर्सनी ट्विटरला समस्या येत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान ट्विटरवर समस्या आल्यानंतर यूजर्स अन्य साइट्सवर शिफ्ट झाले आहे. अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटर विषयी मिम्स व्हायरल होत आहे. यामध्ये अनेक जण एलॉन मस्क यांची खिल्ली उडवत आहे. एका यूजरने लिहिले आहे की एलॉन मस्कने ट्विटरला खरेदीकरून याला एकदम worse बनवले आहे. तर अनेक जण आपला राग देखील अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त करत आहे. Twitter Down

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news