

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील हिंगणी-सेलू मार्गावरील पेंढरी घाटात एक खासगी ट्रॅव्हल बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली आहे. शुक्रवारी (दि.१६) रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या बसमध्ये एकूण ३० प्रवासी असून त्यापैकी १० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, नागपूरकडून हिंगणी मार्गे वर्धाकडे जाणारी ट्रॅव्हल्स २० फूट खोल खड्ड्यात कोसळली आहे. पेंढरी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक आहे. या अपघातात ३० प्रवाशांपैकी १० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत प्रवाशांना पुढच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अद्याप अपघातातील जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.
हेही वाचलंत का?