राज्यातील भूमिअभिलेख अधिकार्‍यांच्या बदल्या; हट्टेकर, मिसाळ यांना पदोन्नती

राज्यातील भूमिअभिलेख अधिकार्‍यांच्या बदल्या; हट्टेकर, मिसाळ यांना पदोन्नती
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या भूमिअभिलेख विभागात काही अधिकार्‍यांना पदोन्नत्या, तर काहींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कमलाकर हट्टेकर लालसिंग मिसाळ यांना उपसंचालकपदावर पदोन्नती मिळाली आहे. आशा जाधव, कृष्णा चावर, कृष्णा शिंदे, संग्राम जोगदंड, भारती खंडेलवाल, प्रभाकर मुसळे, नरेंद्र झांबरे यांची पदोन्नतीने जिल्हा अधीक्षक संलग्न उपसंचालकपदावर पदोन्नती करण्यात आली आहे. कमलाकर हट्टेकर पदोन्नती उपसंचालक (पुणे आयुक्त कार्यालय), संजय निरभवणे (झोपडपट्टी पुनर्वसन मुंबई), डॉ. लालसिंग मिसाळ उपसंचालक अमरावती अशी नियुक्ती झाली आहे.

नियतकालिक बदल्या : हेमंत सानप (जिल्हा अधीक्षक नाशिक), कृष्णांत कणसे (जिल्हा अधीक्षक मुंबई उपनगर), धनाजीराव धायगुडे (जिल्हा अधीक्षक मुंबई शहर), विजयकुमार वीर (जिल्हा अधीक्षक छत्रपती संभाजीनगर), अभय जोशी (जिल्हा अधीक्षक नागपूर), सुरेखा सेठीय (जिल्हा अधीक्षक सांगली), गजानना डांबेराव (जिल्हा अधीक्षक नांदेड) येथे बदली करण्यात आली आहे.

उपअधीक्षक तसेच नगरभूमापन बदल्या : पुणे विभागातील नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1 पदावर गणेश कराड, नगर भूमापन अधिकारी क्रमांक 2 पदी बाळासाहेब भोसले, भूमापन अधिकारी पिंपरी चिंचवड पदावर अमित ननवरे तसेच उपअधीक्षक हवेली या पदी अमरसिंह पाटील, धनराज शिंदे (दौंड), संजय धोंगडे (बारामती), ऊर्मिला गलांडे (खंडाळा), पल्लवी पिंगळे-पाटील (मावळ) यांची उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी असलेले शिवप्रसाद गौरकर संजय कुंभार यांना जमाबंदी आयुक्त पुणे कार्यलयात पदस्थापना देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news