पर्यटकांना खुणावतेय ठोसेघरचे सौंदर्य

पर्यटकांना खुणावतेय ठोसेघरचे सौंदर्य
Published on
Updated on

परळी; पुढारी वृत्तसेवा :  पावसामुळे कास-ठोसेघर परिसरातील डोंगरदर्‍यात विलोभनीय निसर्गसौंदर्य अवतरले आहे. संततधार सरींमुळे निर्माण झालेल्या विहंगम निसर्ग सौंदर्याने हा परिसर प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. येथील डोंगरदर्‍यांनी हिरवाईची शाल पांघरून घेतली आहे. परिसरातील निसर्ग हिरवागार बनला आहे. उंच उंच डोंगर जे उन्हाळ्यात वणव्यामुळे काळेकुट्ट पडले होते ते आता हिरवीगार निसर्ग नवलाई दाखवू लागले असून, हा परिसर पर्यटकांना खुणावू लागला आहे.

डोंगररांगांनी रूपडे पालटले… सर्वत्र हिरवा गालिचा…

जून महिना सुरू झाला की पाऊस सुरू होतो आणि निसर्ग बहरू लागतो. यंदा पावसाने ओढ दिल्याने पावसाळी पर्यटनही लांबले होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, येथील डोंगररांगा संततधार पावसामुळे आता हिरवळल्या आहेत. सर्व परिसरात हिरवा गालिच्छा पसरू लागला आहे. सर्वत्र रानफुले फुलू लागली आहे. येथील वाराही सुसाट वेगाने मदमस्त बेधुंदपणे वाहू लागला आहे. डोंगर पर्वतांवर धुक्याची शाल पसरली असून हा परिसर तरुणांबरोबरच निसर्गप्रेमींना खुणावत आहे. खास पावसाळ्यातील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नवविवाहित, तरुणांई, निसर्गप्रेमी कास-ठोसेघर येथे येत आहेत.

धबधब्याचे सौंदर्य मोबाईलमध्ये

निसर्गाच्या जादुई कुंचल्याची किमया टिपताना कास-ठोसेघरचे विहंमग रूप पाहण्याची मजा काही औरच असते. उंचावरून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. डोंगररांगांमधून फेसाळणार्‍या धबधब्याचे द़ृश्य पाहण्यासाठी दुचाकी तसेच चार चाकीमधून फिरायला येणार्‍यांची संख्या वाढली असून परिसरात भात लावणीच्या कामास वेग धरला आहे.

ठोसेघर धबधब्याकडे पर्यटकांचा कल

निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण, आकाशाशी स्पर्धा करणारे मोठाले वृक्ष, झोेका घेऊन अंगावर रोमांच उभा करणारा खट्याळ वारा, हिरवा शालू परिधान करून पावसाच्या वर्षावाने चिंब चिंब भिजणारा निसर्ग असे विहंगम द़ृश्य महाबळेश्वर-पाचगणी, कास, ठोसेघर, बामणोली परिसरात पाहावयास मिळत असून, ऐन पावसातही अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. परळी खोर्‍यातील पर्यटनस्थळी पर्यटकांची रिघ लागत असून, विकेंडला तुडुंब गर्दी होत आहे. विशेषत: ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी अनेकांचा कल वाढला आहे. येथील गॅलरी तर विकेंडला हाऊसफुल्ल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news