

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : पैशाची आवश्यकता असेल; परंतु तुम्हाला ते मिळणार नाहीत. प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. कुटुंबासोबत सामान्यांपेक्षा जास्त वेळ घालवता, तेव्हा थोडे वाद होऊ शकतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मिथुन : प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही. प्रेमीला अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांचा विश्वास वाढेल आणि प्रेमाला उंची प्राप्त होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या गहाळ होऊ शकतात. वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला सामोरे जावे लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात शक्ती खर्च करू नका. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : प्रेमासाठी चांगला दिवस. ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, जोडीदार त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : तुम्ही एकदम शांततेत राहाल. मौजमजा करण्याचा तुमचा मूड असेल. वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. संशयास्पद आर्थिक योजनांत गुंतवणूक करू नका. राहते घर बदलणे शुभदायी ठरेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आरोग्य बहरून जाईल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : घरात काहीतरी घडल्याने भावनिक व्हाल. भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : तुमच्या प्रेमाच्या हसण्याने दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मीन : तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता असेल. कठोर बोलण्यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. मनावर ताबा ठेवा. [/box]
– ज्यो. मंगेश महाडिक