Today’s Actor Photo : रश्मिकाचे स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो, अनुष्काच्या अदा, ईशाचा बोल्ड अंदाज, सलमानची व्हायरल पोस्ट.. पहा व्हायरल फोटोंची चर्चा

Today’s Actor Photo : रश्मिकाचे स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो, अनुष्काच्या अदा, ईशाचा बोल्ड अंदाज, सलमानची व्हायरल पोस्ट.. पहा व्हायरल फोटोंची चर्चा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोरंजन विश्वातील प्रत्येक बातमीवर चाहते बारीक नजर ठेवून असतात. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. याची जाणीव कलाकारांनाही असते. यामुळेच ते वेळोवेळी स्वतःशी संबंधित अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतात. आजही अनेक सिनेकलाकारांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून स्वतःशी संबंधित माहिती चाहत्यांसाठी शेअर केली आहे. काही निवडक कलाकारांच्या (Today's Actor Photo) पोस्ट्सवर एक नजर टाकूया…

Today's Actor Photo :

रश्मिका मंदाना

गुडबाय चित्रपटाव्यतिरिक्त रश्मिका मंदाना सध्या निवांतपणाचे क्षण घालवत आहे ज्यामुळे ती खूप चर्चेत आहे. तीने आज स्वतःचा असा एक फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये दिसून येत आहे.

संजना संघी

बॉलिवूड अभिनेत्री संजना सांघी नुकतीच आदित्य रॉय कपूरसोबत राष्ट्र कवच ओम या चित्रपटात दिसून आली होती. संजनाच्या सुंदरतेचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्रीने रविवारी तिने तीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. देसी लूकमधील तीची स्टाइल चाहत्यांना खूप आवडत आहे.

तारा सुतारिया

तारा सुतारिया ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ताराने आज तिच्या कॅन्डल लाईट डिनरचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सलमान खान

बॉलीवुडचा दबंग सलमान खान लवकरच 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमामध्ये दिसून येणार आहे. या सुपरस्टारने आज याच आगामी सिनेमाचा कलाकार पलक तिवारी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पायल रोहतगी

अभिनेत्री पायल हीने आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. तीने आपले फोटो शेअर करत 'गप्प राहणे मुर्खांसाठी सर्वात चांगले उत्तर आहे.

उर्वशी रौतेला

उर्वशीने आज स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या साडीत पोज देताना दिसून येत आहे. यासोबत तीने एक दर्दी कॅप्शनही दिले आहे, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार आहे. तीने यामध्ये लिहिले आहे की, 'आज पुन्हा आरसा लाच घेताना पकडला गेला, हृदयात वेदना होत होत्या आणि चेहरा हसताना पकडला गेला.'

अनुष्का सेन

अनुष्का सेनने खूप कमी वयात मोठे स्थान मिळवले आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकताच तीने तीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ करत आहे.

ईशा गुप्ता

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. अलीकडेच ती बॉबी देओलसोबत 'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये दिसून आली होती. आज तिने ब्लॅक आउटफिटमधला तिचा फोटो शेअर केला आहे. तीची या नव्या शैलीतील फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

अक्षरा सिंग

अभिनेत्री अक्षरा सिंग ही भोजपुरीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही खूप प्रसिद्ध आहे. नुकतीच ती एअरपोर्टवर मस्त स्टाईलमध्ये दिसून आली. तीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

शर्ली सैतिया

अभिनेत्री शर्ली सैतियाने आज तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. नुकतेच ती निकम्मा या चित्रपटात दिसून आली होती. मात्र, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirley (@shirleysetia)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news