‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा आज अखेरचा दिवस

‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा आज अखेरचा दिवस
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरकरांना कपड्यांपासून ज्वेलरीपर्यंत, प्युरिफायरसारख्या होम अ‍ॅप्लायन्सेसपासून मोबाईल अ‍ॅक्सेसरिजपर्यंत, चटपटीत खाद्यपदार्थांपासून खेळण्यांपर्यंत वैविध्यपूर्ण वस्तूंच्या खरेदीसह लज्जतदार मेजवानीचा मनसोक्त आनंद देणार्‍या दै. 'पुढारी' आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलला सोमवारी मोठी गर्दी झाली. मंगळवार (दि.26) रोजी या खरेदीच्या उत्सवाची आणि खाद्य मेजवानीची सांगता होणार आहे. या पर्वणीचा लाभ घेण्याची या वर्षातील ग्राहक व खवय्यांना ही शेवटची संधी आहे.

या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक रॉनिक स्मार्ट वॉटर हिटर आणि सोसायटी चहा, तर आइस्क्रीम पार्टनर क्रेझी आइस्क्रीम आहेत. दै.'पुढारी' आणि टोमॅटो एफ. एम. कस्तुरी क्लबतर्फे फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल ग्राऊंड येथे चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात सोमवारी नाताळच्या सणानिमित्त कोल्हापूरकरांनी खरेदी व खाद्य मेजवानीचा मनमुराद आनंद लुटला.

'सांता'सोबत सेल्फीसाठी गर्दी

फेस्टिव्हलच्या प्रवेशद्वारावर ख्रिसमसच्या थिमवर करण्यात आलेली सजावट आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. सांताक्लॉजचा आकर्षक देखावा असून, त्यातील सांताक्लॉजसोबत सेल्फी काढण्याचा मोह आबालवृद्धांना आवरता येत नव्हता. सजावटीचा भव्य ख्रिसमस ट्री आणि त्या पार्श्वभूमीवर स्टीक मॅन आणि जोकर हे अनेकांच्या कुतूहलाचा विषय होते.

दैनंदिन गरजांच्या वस्तूंपासून ते चारचाकी वाहनांचे स्टॉल प्रदर्शनात आहेत. सौंदर्यप्रसाधने, वनौषधी, चटण्या, मसाल्याचे पदार्थ, पापड, लोणचे, कपडे, ज्वेलरी, कीटकनाशक, इलेक्ट्रिक वस्तूंसह विविध खाद्यपदार्थ प्रदर्शनात आहेत. दुग्धजन्य पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, चप्पल, शूज, इमिटेशन, स्टडी टेबल यांचे स्टॉल्स आहेत. फर्निचर, गृहोपयोगी वस्तू, घर सजावटीच्या वस्तू, चहा, पॅकिंगच्या खाद्य वस्तू, आरोग्यविषयक विविध उत्पादने, घरगुती बिस्किटे यांच्या अशा हजारो पर्यायांमधून आपल्याला हवी ती वस्तू निवडण्याची संधी आहे. प्रदर्शनात खरेदी आणि बुकिंग करणार्‍या ग्राहकांना कंपन्या, स्टॉलधारकांनी अनेक ऑफर्स दिल्या आहेत. फेस्टिव्हलमध्ये व्यावसायिक व खाद्यपदार्थांचे मिळून 130 हून अधिक स्टॉल्स आहेत.

फूड ब्लॉगरनी घेतली दखल

कोल्हापुरातील फूड व्हिडीओ ब्लॉगरनी 'पुढारी' शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलची आवर्जून दखल घेतली. चैतन्य डोंगरे यांच्या यूट्यूब वरील chaitanya food vlog आणि योगेश बनसोडे यांच्या foodielucky या चॅनलवर या फेस्टिव्हलचे माहितीपर व्हिडीओ शेअर केले आहेत.

खाद्य मेजवानीला तुफान गर्दी

बटर चिकन, चिकन पराठा, स्पेशल तंदूर कबाब, वडा कोंबडा, सोल कढी, चिकन 65, खिमा पराठा, फिशचे नावीन्यपूर्ण प्रकार, लहम बिर्याणी, मोमोज, सीएम बिर्याणी व चिकन वडा, सोलापुरी चिकन-मटण, रक्ती मुंडी थाळी, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा व चिकन थाळी या पदार्थांबरोबरच डोमिनोजच्या पिझ्झाचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे. शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी थालीपीठ, इडली-उडीद वडा, वांगी भाकरी, नाद ब—ह्म इडली, दाबेली, चौपाटी पदार्थ, साऊथ इंडियन, पिझ्झा सँडविच सारखे फास्ट फूड, स्प्रिंग पोटॅटो, तसेच फ्रूट चाट आणि कस्टर्ड मसाले पानाचे विविध प्रकार, अशी पदार्थांची भरगच्च मेजवानी उपलब्ध आहे. एकाच छताखाली अख्ख्या कुटुंबाच्या खरेदीचा आनंद देणारा हा उत्सव कोल्हापूरमधील खवय्येगिरीलाही तृप्त करणारा ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news