Titanic Ship : ‘टायटॅनिक’मधून कसा बाहेर पडला मालक इस्मे?

Titanic Ship
Titanic Ship
Published on
Updated on

लंडन : जेम्स कॅमेरूनच्या (Titanic Ship) 'टायटॅनिक' या चित्रपटाला आता 25 वर्षे झाली आहेत. मात्र, 'टायटॅनिक' जहाजाची दुर्घटना घडून आता शंभरपेक्षाही अधिक वर्षे उलटून गेली आहेत. या चित्रपटामुळे 1912 मध्ये घडलेल्या मूळ दुर्घटनेविषयीचे कुतुहल आणखी वाढले. चित्रपटात अनेक काल्पनिक पात्रे आणि खर्‍या व्यक्तिरेखा यांची सरमिसळ आहे. त्यामध्येच 'टायटॅनिक' जहाजाचा मालक असलेल्या इंग्लंडच्या अतिश्रीमंत व्यक्तीचेही पात्र पाहायला मिळते. जोसेफ ब्रूस इस्मे नावाचा हा माणूस त्या भीषण दुर्घटनेतून बचावला होता; पण त्यासाठी त्याने काय केले होते याबाबत नेहमीच चर्चा होते.

इंग्लंडच्या साऊथप्टनपासून न्यूयॉर्कपर्यंतचा प्रवास करत असणार्‍या 2200 प्रवाशांपैकी 1500 प्रवाशांचा टायटॅनिकच्या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. समोर आलेल्या हिमनगाच्या टोकाला धडकून टायटॅनिक (Titanic Ship) बोटीचा मोठा भाग तुटला होता आणि त्यामुळे टायटॅनिक बोट बुडाली होती. त्यामुळे अनेक लोकांना आपले जीव हे गमावावे लागले होते. या घटनेबद्दल अनेक जण अद्यापही संशोधन करताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनेकांनाही या घटनेबद्दल आकर्षण असल्याने त्याबद्दलची अनेक माहितीही काढली जाते.

या घटनेतील अनेक पात्र आहेत जी लोकांच्या आजही लक्षात आहेत. त्यातील एक म्हणजे जोसेफ ब्रूस इस्मे. इंग्लंडमधील जोसेफ ब्रूस इस्मे हा माणूस अत्यंत श्रीमंत मानला जात होता. त्यामुळे त्याची ख्यातीही त्याकाळी अधिक होती. जोसेफ ब्रूस इस्मे हा 'टायटॅनिक'चा मालक होता व त्यामुळे टायटॅनिक (Titanic Ship) आपल्या पहिल्या प्रवासाला निघाली होती तेव्हा तो त्या बोटीतही होता. हा जोसेफ ब्रूस इस्मे 14 एप्रिल 1912 च्या रात्री टायटॅनिक बोट बुडाली तेव्हा स्त्रियांचे कपडे घालून महिलांसाठीच्या लाईफबोटमध्ये बसून पळून गेला होता, असे म्हटले जाते.

टी.व्ही. मालिका 'व्होएजर्स'च्या 'टायटॅनिक' (Titanic Ship) बाबतच्या एपिसोडमध्ये तसे दर्शवण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये तथ्य नसल्याचेही सांगितले जाते. दुर्घटनेची चौकशी करणार्‍या लॉर्ड मेर्सी यांनी म्हटले होते की शेवटच्या शिल्लक लाईफबोटीत बसण्यापूर्वी त्याने इतरांना सुटकेसाठी मदतही केली होती. त्यावेळी जोसेफ ब्रूस इस्मे याच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले होते. इस्मे याने जहाजाच्या कॅप्टनला 'टायटॅनिक'चा वेग वाढवण्यास सांगितले होते व त्यामुळेच दुर्घटना घडली असे म्हटले जाते. त्याच्यावर इंग्लंडच्या कोर्टात अनेक खटलेही दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर झालेल्या खटल्यांमधून त्याला निर्दोष मुक्तताही मिळाली होती.

1937 साली जोसेफ ब्रूस इस्मेचा मृत्यू झाला. टायटॅनिकची (Titanic Ship) दुर्घटना घडल्यानंतर तो कुटुंबीयांसमवेत आयर्लंडला निघून गेला होता. एका मुलाखतीतही त्याने आपल्या अनुभवांबद्दल आणि आपल्या नातवाबद्दलही सांगितले होते. त्याचे असे म्हणणे होते की त्याला अमेरिकेच्या सरकारकडून आणि पत्रकारांकडून फार त्रास सहन करावा लागला होता. टायटॅनिक जहाज जोसेफ ब्रूस इस्मेमुळे बुडाले असाही त्याच्यावर आरोप केला जातो व त्यावर अनेकदा चर्चाही झाली होती. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे जोसेफ ब्रूस इस्मे तणावात होता त्याचबरोबर त्याला नैराश्यानेही घेरले होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news