

पुढारी ऑनलाइन डेस्क : मोदींविरोधी एकत्रित निवडणूक लढावी का स्वतंत्र अजून निर्णय नाही, किंवा मोदींविरोधात कोणता चेहरा असेल याचा अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकाराच्या एका प्रश्नाला दिले.
पत्रकार परिषदेत शरद पवार यांना मोदींविरोधात सर्व पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढवणार का स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार, तसेच एकत्रित निवडणूक लढवणार असेल तर मोदींविरोधात कोणता चेहरा असेल असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. याचे उत्तर देताना शरद पवार म्हणाले अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आमच्या चर्चा सुरू आहे परंतू आम्ही कोणत्याही निर्णयापर्यंत अजून पोहोचलो नाही. तसेच मोदींविरुद्ध कोणता चेहरा असेल याचाही काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असे शरद पवार म्हणाले.
तसेच ईडी आणि त्याच्या कारवाई विषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पवार म्हणाले, भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. कारण नसताना राऊत यांना जेलमध्ये टाकण्यात आले. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आरोप असणारे नेता भाजपमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना क्लिनचीट मिळाली. यावर पवारांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. तसेच काही नेत्यांनी स्वतःच याबाबत सांगितले आहे, असे म्हटले
तर शेतक-यांच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, गुजरात किंवा अन्य कोणत्याही राज्यातील ऊस उत्पादक किंवा अन्य शेतक-यांची महाराष्ट्राच्या शेतक-याशी तुलना होऊ शकत नाही, असे शदर पवार म्हणाले.