Akshay Kumar-Tiger Shroff : टायगरचं खिलाडी कुमारला एप्रिल फूल; राग येताच असं काही केलं की… (video)

Akshay Kumar-Tiger Shroff
Akshay Kumar-Tiger Shroff
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ ( Akshay Kumar-Tiger Shroff ) यांचा आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट चर्चेत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या चित्रपटातील धमाकेदार टिझर आणि वेगवेगळे लूक्स पाहायला मिळाले आहेत. यापूर्वीही होळी दिवशीचा दोघांचा रंग खेळतानाचाही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता एप्रिल फूलच्या निमित्ताने आणखी एका मजेशीर व्हिडिओने चर्चेना उधान आलं आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ ( Akshay Kumar-Tiger Shroff ) यांचा त्याच्या इन्स्टाग्रामवर एप्रिल फूलचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सुरूवातीला अक्षय आणि टायगर इतर काराकारांसोबत कोणता तरी खेळ खेळणार असतात. याच दरम्यान टायगर अक्षय कुमार मैदानात यायच्याआधी कोकमच्या बाटलीत काहीतरी मिसळून हलविताना दिसतोय. यानंतर तो ती बाटली एका खुर्चीवर ठेवतो.

यानंतर अक्षय कुमार खेळण्यासाठी धावत-पळत मैदानात येत असतो. यावेळी टायगर त्याला येताना ती कोकमची बाटली देण्यास सांगतो. अक्षय ती देत असताना त्याच्यावरील झाकणही काढण्यास सांगतो. याच दरम्यान टायगर पाठिमागून बाटलीवर काहीतरी मारतो आणि अक्षयच्या हातातील कोकमचे पेय त्याच्याच चेहऱ्यावर पडते. या घटनेनंतर सगळे जण त्याच्यावर जोरजोरात हसतात. मग अक्षयला राग येतो आणि उतलेलं कोकम इतर सर्वाच्या दिशेने फेकतो. यानंतर सर्वजण बाजूला पळतात. अक्षय कुमारची अशी फसवणूक आजच्या दिवशी म्हणजे, एप्रिल फूलच्या निमित्ताने केली आहे.

याशिवाय व्हिडिओच्या बॅकग्रांऊडला 'एप्रिल फूल बनाया, इनको गुस्सा आया' असे गाण्याचे बोल वाजत आहेत. अक्षय आणि टायगरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यत ११ लाख ८८ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलं आहेत.

'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट ईदला म्हणजेच १० एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय आणि टायगरसोबत बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर, आलिया एफ दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news