Janhvi Kapoor : ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे…’;बोनी कपूरने जान्हवीच्या नात्याचा केला खुलासा | पुढारी

Janhvi Kapoor : 'माझं तुझ्यावर प्रेम आहे...';बोनी कपूरने जान्हवीच्या नात्याचा केला खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र, दोघांना त्याच्या रिलेशनशीपचा खुलासा केलेला नव्हता. तर दोघेजण अनेक वेळा वेगवेगळ्या नाईट पार्टीतदेखील स्पॉट झाले होते. यानंतर आता निर्माते बोनी कपूरने त्यांची मुलगी जान्हवी कपूरच्या नात्याचा खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या 

नुकतेच निर्माते बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत मुलगी जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबतच्या रिलेशनशीपचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्यांनी ”शिखर पहाडियावर माझं खूपच प्रेम आहे. तो कौतुक करण्यासारखा आहे. खरं तर, काही वर्षांपूर्वी, जान्हवी त्याच्याकडे पाहतही नव्हती, पंरतु, तरीही तो तिच्याशी मैत्रीसारखे वागत होता. त्याच वेळी मला खात्री पटली की, तो कधीही वाईट वागू शकत नाही. जान्हवी आणि अर्जुन कपूरसोबत त्याचे चांगले मैत्रीचे सबंध आहेत. तो आमच्या आजूबाजूला असल्यावर आम्हच्यातील एक वाटतो. आम्ही धन्य आहोत. खास करून माझी जान्हवी.”

यावरून ठोस अशी माहिती मिळत नसली तरी, जान्हवी आणि शिखर यांच्या काहीतरी रिलेशन असल्याचे समोर येत आहे. बोनी कपूर यांनी त्याच्याबद्दल चांगले बोलत असल्याने अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत.

मात्र, जान्हवीने शिखरसोबतच्या तिच्या नात्याची अधिकृतपणे खुलासा केलेली नसला तरी, दोघेजण अनेकवेळा लंच आणि डिनर डेटला जाताना दिसली आहेत. यामुळे दोघांच्या रिलेशनशीपच्या अफवा पसरल्या होत्या. शिखर जान्हवीसोबत तिची बहीण खुशी कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला होता. गेल्या महिन्यात तिच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शिखर आणि मित्र ओरीसोबत तिरुपती मंदिराला भेट दिली होती. यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

बोनी कपूर यांच्या वक्रफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबतच्या आगामी ‘मैदान’ चित्रपटासाठी तयारी करत आहेत. या चित्रपटाची कथा सय्यद अब्दुल रहीम या नायकाची आहे, ज्याने फुटबॉलच्या माध्यमातून भारताचा गौरव केला. हा चित्रपट अमित रविंदरनाथ शर्मा यांनी दिग्दर्शित केले आहे. यात प्रियमणी, गजराज राव, रुद्रनील घोष यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

Back to top button