

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : यापूर्वी तीन वेळी मातृत्वाची अनुभूती आली. पण, तिन्ही वेळेला नियतीने डाव साधला. यावेळी सारेच आनंदात असताना. नैसर्गिक प्रसुती झाली, दोन बछड्यांना जन्म दिला. पण, यावेळीही त्यांनी जगाचा आणि मातेचा निरोप घेतला. (Tiger Cubs Death) ही व्यथा आहे, नागपुरातील गोरेवाड्यातील ली वाघिणीची. प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली गेली. पण, सारे व्यर्थ. प्राणिसंग्रहालयाचे संचालक शतानिक भागवत, पशुवैद्यक डॉ. मयूर पावशे, अभिरक्षक दीपक सावंत, सहायक वनसंरक्षक सारिका खोत, सहाय्यक वनसंरक्षक माडभूशी यांची धडपड निरर्थक ठरली. महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यापीठाचे प्रमूख आणि वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिरीश उपाध्ये यांना आमंत्रित करण्यात आले होते.