Tiger 3 First Day First Show : टायगर ३ एकाच वेळी ८९०० स्क्रिनवर रिलीज, पठान, गदरचे रेकॉर्ड मोडणार?

tiger 3 movie
tiger 3 movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खान स्टारर चित्रपट टायगर ३ (Tiger 3) रिलीज झाला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया अद्भूत आहेत. फर्स्ट डे फर्स्ट शोमध्ये जबरदस्त गर्दी पाहायला मिळणार आहे. (Tiger 3 First Day First Show) ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता 'टायगर' फ्रेंचायजीचा तिसरा चित्रपटदेखील रिलीज करण्यात आला आहे. आता टायगर ३ (Tiger 3)बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन करेल आणि पठाण, गदर चा रेकॉर्ड तोडणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.  (Tiger 3 First Day First Show)

यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गत स्पाय युनिव्हर्सच्या 'टायगर' फ्रेंचायजीचा तिसरा चित्रपट 'टायगर -३' ला दिवाळीचे ओचित्य साधून १२ नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात आला आङे. चित्रपटाला जगभरात ८९०० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आले आहे. भारतात ५५०० स्क्रीन्स मिळाले आहेत. शाहरुख खानचा 'पठान' ७७०० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता. रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की, सलमान खानचा चित्रपट शाहरुखच्या 'पठान'ला पहिल्या दिवसाच्या कमाईबाबतीत मागे टाकू शकणार नाही.

'टायगर ३' फर्स्ट डे कलेक्शन

रिपोर्टनुसार, 'टायगर ३' चित्रपटाचे ११ नोव्हेंबरपर्यंत ॲडव्हान्स बुकिंगद्वारे झालेली कमाई २० कोटी आहे. या चित्रपटाचे ७.६० लाख तिकिट विक्री झालेले आहेत. पहिल्या दिवशीच्या कमाईबाबतीत 'गदर-२' टक्कर देऊ शकते. सनी देओलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४०.१ कोटींचे कलेक्शन केलं आणि सलमानचा चित्रपट ओपनिंग डेला जवळपास ४० कोटींचे कलेक्शन करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news