नगरमध्ये 850 किलो गोमांस हस्तगत; एकाला अटक

नगरमध्ये 850 किलो गोमांस हस्तगत; एकाला अटक

Published on

नगर, पुढारी वृत्तसेवा: गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री करण्यासाठी घेऊन जाणार्‍या एकाला एलसीबी पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन मुसा शेख (रा. बाराइमाम, कोठला) असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे.

संदीप घोडके यांच्या फिर्यादीवरून मोहसीन मुसा शेख विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झेंडीगेट परिसरात मोहसीन शेख हा गोमांस विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने झेंडीगेट परिसरात छापा टाकला असता मोहसीन शेख हा पिकअप वाहनासह गोमांस विक्रीसाठी घेऊन जाताना मिळून आला. त्याच्याकडून 1 लाख 27 हजार 500 रूपये किंमतीचे 850 किलो गोमांस, 3 लाख रूपये किंमतीचे पिकअप वाहन असा 4 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

https://youtu.be/7KwsutS10qQ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news