

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये (Poonch LOC) नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सीमा ओलांडून घुसखोरी केलेल्या तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यांसोबत चकमक झाली. यामध्ये लष्कराच्या जवानासह दोन दहशतवादी जखमी झाले. लष्कराने दहशतवाद्यांकडून आयईडी आणि शस्त्रास्त्रांसह ड्रग्ज जप्त केले आहेत.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पूंछ सेक्टरमध्ये (Poonch LOC) नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली. लष्कराचे जवान या भागात गस्त घालत असताना एलओसीवरून तीन दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. यावेळी दहशतवादी आणि लष्करी जवानांमध्ये गोळीबार झाला.
या गोळीबारात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. तर प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी जखमी झाले. जवानांनी दहशतवाद्यांकडून दारूगोळा, आयईडी आणि ड्रग्ज जप्त केले. लष्कराच्या बॉम्बशोधक पथकाने आयईडी निष्क्रिय केले आहेत.
दहशतवाद्यांची चौकशी केली जात आहे. यासोबतच परिसरात सखोल तपासणी मोहीमही राबविण्यात येत आहे. सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी भारतात कशी घुसखोरी केली, याची चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा