

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' हा चित्रपट रिलीज होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तर चित्रपटाच्या टीमने सेन्सॉर बोर्ड विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. रिपोर्टनुसार, शनिवारी मुंबईमध्ये बॉलीवूड चित्रपट 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चित्रपटाविषयी पत्रकार परिषद झाली. चित्रपटाचे सेन्सॉरशीप झाले आहे. पण, सेन्सॉर बोर्ड चित्रपट रिलीज करण्यास प्रमाणपत्र देत नाहीये. म्हणून निर्माता-दिग्दर्शकाने नाराजी व्यक्त केली आहे.
'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'चे निर्माते वसीम रिज्वी उर्फ जितेंद्र नारायण सिंह म्हणाले, "आम्ही सत्य घटनांवर आधारित चित्रपट बनवला होता. पाकिस्तानातील कराची येथील एक दहशतवादी संघटना जामिया दारुल उलूमने फतवा जारी केला आहे. चित्रपट रिलीज न करण्याची धमकी दिली आहे. सांगा आता आम्हाला चित्रपट बनवण्यासाठी भारतात चित्रपट बनवण्यासाठी आणि रिलीज करण्यासाठी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांची परवानगी घ्यावी लागेल?
आता आम्ही काय हे समजू…'काय या सिनेमॅटिक स्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आम्हा स्वतंत्र लोकांना काही अधिकार नाही?'
या चित्रपटाचा अभिनेता यजुर मारवाहने चित्रपटाचा भाग बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, पहिल्यांदा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अर्शिन मेहताचे म्हणणे आहे की, असे चित्रपट वारंवार बनत नाहीत.