‘पीएम स्कील रन’ मध्ये धावलेत हजारो विद्यार्थी

‘पीएम स्कील रन’ मध्ये धावलेत हजारो विद्यार्थी
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा :  कौशल्य शिक्षणाचा प्रचार-प्रसार व शासनाच्या नवीनतम तंत्रशिक्षण योजनांची माहिती युवकांना व्हावी, यासाठी आयोजित 'पीएम स्कील रन' मॅराथॉन दौडमध्ये हजारोंच्या संख्येनी आयटीआय विद्यार्थी-विद्यार्थींनींनी उर्त्स्फूतपणे सहभाग घेत दौड पूर्ण केली. या उत्साही क्रीडामय प्रसंगाने अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले.

या रनमध्ये विद्यार्थ्यांमधून प्रशिक थेटे प्रथम, गौरव खोडतकर द्वितीय, ललीत गावंडे तृतीय क्रमांक पटकाविला. तर विद्यार्थींनीमधून सलोनी लव्हाळे, मनवा पाबळे, समिक्षा आमझरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्यात. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपयांची पारितोषिके वितरीत करण्यात आलीत. यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना डिजीटल प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
रविवारी, सकाळी ७ वाजता शासकीय आयटीआयच्या परिसरातून 'पीएम स्कील रन' मॅराथॉन दौडला शुभारंभ झाला. अमरावती विभागाचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅराथॉनला मार्गस्थ केले. या मॅराथॉनमध्ये जिल्ह्यातील शासकीय व खासगी आयटीआय संस्थेचे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. शासकीय आयटीआय परिसर-पंचवटी चौक- विभागीय आयुक्त कार्यालय रोड-गर्व्हनमेंट गर्ल्स हायस्कुल-आयटीआय अशी पाच किलोमीटरची मॅराथॉन विद्यार्थी-विद्यार्थीनींनी धावून पूर्ण केली.
उपसंचालक एस. के. बोरकर, सहायक संचालक आर. एम. लोखंडे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी डॉ. आर. ई. शेळके, उप- प्राचार्य आर.जी. चुलेट, एस. एन. बोराडे, अधीक्षक एम. आर. गुढे, विद्याभारती आयटीआयचे प्राचार्य जी.बी. तवर, दहीकर, शिल्प निदेशक रविंद्र दांडगे, निरीक्षक, नेमाडे अस्पाबंडचे रणजीत बंड,एसबीआयचे मॅनेजर इमराना अंसारी, अभिजीत वैद्य आदी मान्यवरांनी सक्रीय सहभाग नोंदविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news