

यवत : दीपक देशमुख : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात या आठवड्यात मोठ्या प्रमाणात फेरबदल होतील. दरवर्षी 31 मे पर्यंत करण्यात येणाऱ्या बदल्या राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने या वर्षी 30 जून पर्यत करण्याचा निर्णय घेत एक महिना बदली कालावधी वाढवला होता त्यामुळे या आठवड्यात बदल्या होणार असून आपल्याला मोक्याच्या ठिकाणी 'पोस्टिंग' मिळावं म्हणून बरेच अधिकारी आणि कर्मचारी 'फिल्डिंग' लावून बसले असले तरी बदल्या करताना कोणाचाही दबाव आला तरी तो झुगारायचा हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचा कडक शिरस्ता असल्याने या 'फिल्डिंग' लावणार्यांची गोची झाली आहे.बदलीसाठी पात्र अधिकारी आणि कर्मचारी यांची धाकधूक यामुळे कायम आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रा मधील बदली आदेश निघाल्यानंतर लगेचच जिल्हा पोलीस दलात बदली सत्र सुरू होणार आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीण चा पदभार स्वीकारल्या पासून आतापर्यंत त्यांना जिल्हा आणि परिसर चांगलाच माहीत झाला आहे,
त्यामुळे कोणत्या ठिकाणी कसा अधिकारी असावा कोणत्या पोलीस स्टेशन हद्दीत जास्ता मनुष्यबळ आवश्यक आहे याचा पूर्ण अंदाज त्यांना असून त्याच दृष्टीने बदली पद्धत ठरणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, नाईक,जवान यांची बदली होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असून नेमकं कोणाची कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये वर्णी लागते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कार्यभार घेतल्यापासून स्थानिक पोलीस स्टेशन प्रमुखाला विश्वासात घेऊन कामकाज करण्याची पद्धती अवलंबल्यामुळे त्या पोलीस स्टेशन मधील इतर कर्मचारी व अधिकारी यांची 'कुंडली' च पोलीस अधीक्षक कार्यालयात तयार झाली असून बदल्या करताना हा 'डाटा' महत्वाची भूमिका बजवणार आहे
आगामी लोकसभा निवडणुका समोर ठेवून निवडणूक आयोगाचे निर्देश विचारता घेता स्व-ग्राम भागात नियुक्त व तालुक्यात 12 वर्ष काम केलेलेकर्मचारी, अधिकारी अधिकारी बदलीसाठी पात्र ठरणार आहेत
स्थानिक पोलीस स्टेशन प्रमुखाला काम करताना जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला पोलीस अधीक्षक मुख्यालयाचा रस्ता दाखविणार असून पोलीस दलातील फेरबदलावर पोलीस स्टेशन प्रमुखांचा वरचष्मा राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा :