कोल्हापुरात उद्यापासून चार दिवस पाणी नाही

कोल्हापुरात उद्यापासून चार दिवस पाणी नाही
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणार्‍या बालिंगा उपसा केंद्राच्या दगडी चॅनेलचे काम गुरुवारपासून (दि. 2) सुरू करण्यात येणार आहे. ते चार दिवस म्हणजे 5 नोव्हेंबरपर्यंत काम चालणार आहे. या कालावधीत बालिंगा उपसा केंद्र पूर्ण बंद ठेवण्यात येणार असून त्यामुळे 2 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत बालिंगा उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्डातील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

गेली अनेक वर्षे रखडलेले दुरुस्तीचे काम ऐन दिवाळीच्या सणातच काढल्याने नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
ए, बी वॉर्ड : फुलेवाडी रिंगरोड परिसर, गजानन कॉलनी, जयभवानी कॉलनी, अयोध्या कॉलनी, गजानन कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, संत सेना, अभियंता कॉलनी मातंग वसाहत, बोंद्रेनगर, शिवशक्ती नगर, मथुरा नगरी, धनगर वाडा, इंगवले कॉलनी, गडकरी कॉलनी, कोतवाल नगर, नृसिंह कॉलनी, सत्याई कॉलनी, राज्याभिषेक कॉलनी, डायना कॅसल, अष्टविनायक कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, माऊली नगर, दत्त कॉलनी व पूर्ण रिंगरोड परिसर, नाना पाटीलनगर, बीडी कॉलनी परिसर, राजोपाध्येनगर, राजेसंभाजी नगर, गंधर्वनगरी, तुळजाभवानी कॉलनी, महादेव नगरी, पांडुरंगनगरी, सुर्वे कॉलनी, गणेश कॉलनी, टाकळकर कॉलनी, संपूर्ण राधानगरी रोड, हरिओम नगर, मोहिते मळा, इंद्रप्रस्थनगर, देवणे कॉलनी, शुश्रूषा नगरी, महालक्ष्मी पार्क, केदार पार्क, शिवराम पोवार कॉलनी, क्रशर चौक झोपडपट्टी, गजलक्ष्मी पार्क व राधानगरी रोड परिसर, संलग्नित ग्रामीण भाग, सरदार तालीम, खंडोबा तालीम, तटाकडील तालीम, मर्दानी खेळाचा आखाडा, संध्यामठ गल्ली परिसर, मरगाई गल्ली परिसर, निवृत्ती चौक, ब्रह्मेश्वर परिसर, साकोली कॉर्नर, बिनखांबी, मिरजकर तिकटी, दिलबहार तालीम परिसर, टेंब्ये रोड, बालगोपाल तालीम, बाराईमाम, जुना वाशी नाका, विजयनगर, वांगी बोळ, उमा टॉकीज, गुजरी व संलग्नित ग्रामीण भाग इत्यादी.

सी वॉर्ड : आझाद गल्ली, मटण मार्केट, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कामगार चाळ, सुभाष रोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतार वाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, शाहूपुरी कुंभार गल्ली, भवानी मंडप, सब जेल परिसर, मिरजकर तिकटी परिसर, महालक्ष्मी नगर, सावित्रीबाई फुले दवाखाना, कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, महाद्वार रोड, रंकाळा टॉवर, गुजरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोर्ले कॉर्नर, सिद्धार्थनगर, दसरा चौक, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, लक्षतीर्थ, बलराम कॉलनी व संलग्नित ग्रामीण भाग इत्यादी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news