Bahubali Before The Beginning गेला डब्यात; दीडशे कोटी सुद्धा पाण्यात

Bahubali Before The Beginning गेला डब्यात; दीडशे कोटी सुद्धा पाण्यात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेता प्रभास आणि दिग्दर्शक एस.एस. राजमौली (s.s.rajamouli) यांच्या 'बाहुबली : द बिगिनिंग' ( Baahubali : The Beginning) आणि 'बाहुबली २ : द कनक्ल्युजन' ( Baahubali 2: The Conclusion) या दोन चित्रपटांनी काय धुमाकूळ घातला होतो हे सर्वांनाच माहिती आहे. या चित्रपटाने सर्व चित्रपटगृहात फक्त भारतातच नाही तर विदेशातसुद्धा रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती.

याच चित्रपटाच्या प्रिक्वेलची वेब सिरीजमध्ये 'बाहुबली : बिफोर द बिगिनिंग' ( Bahubali : Before The Beginning ) निमिर्ती करण्याची घोषणा नेटफ्लिक्सने केली होती. या प्रोजक्टमध्ये बाहुबली आई शिवगामी हिची गोष्ट दाखवली जाणार होती. या वेब सिरीजचे काम देखिल सुरु झाले. स्टारकास्ट देखिल ठरली. शिवाय भव्यदिव्य सेट देखिल उभारला गेला. पण आता चित्रपट बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणामुळे ही बेव सिरीज फक्त डब्यातच गेली नाही तर याच्यासाठी पाण्यासारखे खर्च करण्यात आलेले १५० कोटीहून अधिक रुपये पाण्यात गेले आहेत.

बाहुबली ( Bahubali ) चित्रपट सिरीजचा प्रिक्वेल वेब सिरीज मध्ये करण्याची घोषणा नेटफ्लिक्सने केली होती. शिवगामी या व्यक्तीरेखेवर आधारीत ही वेबसिरीज होती. या प्रोजेक्टमध्ये अभिनेत्री म्हणून मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हिची निवड करण्यात आली होती. तसेच या दिग्दर्शन देव कट्टा (Deva Katta) करणार होते. या वेबसिरीजची तयारी सुरु झाली होती.

या प्रोजेक्टवर १५० हून अधिक रुपये खर्च करण्यात आले तसेच ६ महिने काम देखिल चालले. याचा हैदराबादमध्ये भव्य दिव्य सेट देखिल उभारण्यात आला. या वेब सिरीज मध्ये मृणाल ठाकूर सह अभिनेत्री वामिका गब्बी (Wamiqa Gabbi) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (nayantara) यांना देखिल घेण्यात आले होते. अखेर सर्व तयारी करुन योग्य नियोजन न झाल्यामुळे या प्रोजक्टला बंद करण्याची वेळ आली. बाहुबली ही मजबुत आणि दर्जेदार पटकथा असलेला चित्रपट होता. त्याच्या तोडीचीच वेबसिरीज बनवणं किंवा त्याच्या आसपास पोहचू शकत नसल्यामुळे निर्मात्यांनी या प्रोजेक्टला बंद करण्याचा निर्णय घेतला. बाहुबलीने जे यश निर्माण केले किंवा या चित्रपटाने जी भव्यता प्रेक्षकांना दिली त्यांच्यामध्ये कोणतीच तडजोड मान्य नसल्यामुळे निर्मात्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

बाहुबलीच्या ( Bahubali ) दोन्ही चित्रपटात प्रभास (Prabhas), राणा दग्गुबाती (Rana Daggubati), अनुष्का शेट्टी (Anushka Shetty), तमन्ना भाटीया (Tamannaah Bhatia), राम्या कृष्णन (Ramya Krishnan), सत्यराज (Sathyaraj), नासर (M. Nassar) आणि सुब्बाराजू (Subbaraju) या दिग्गज कलाकरांनी भूमिका बजावल्या होत्या. एस.एस. राजमौली यांनी हे चित्रपट दिग्दर्शित केले होते. या चित्रपटाने ३ राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. तर या चित्रपटाचा प्रीमियर ३९ व्या मॉस्को इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात पार पडला होता. या चित्रपटाचा प्रिक्वेलच्या निर्मितीस सध्या थांबविण्यात आले असले तरी निर्माते पुन्हा बनविण्याचा विचार करु शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news