बाबा वेंगाच्या २०२२ सालासाठी ‘या’ ६ भविष्यवाणी; २ ठरल्‍या खर्‍या, भाकितांविषयी जगात कुतूहल अन् टेन्शन

बाबा वेंगाच्या २०२२ सालासाठी ‘या’ ६ भविष्यवाणी; २ ठरल्‍या खर्‍या, भाकितांविषयी जगात कुतूहल अन् टेन्शन
Published on
Updated on

लंडन : नॉस्ट्रॅडेमसपासून ते फुटबॉल वर्ल्डकपच्या सामन्यांविषयी भाकीत करणार्‍या ऑक्टोपसपर्यंत अनेक भविष्यवेत्त्यांविषयी व त्यांच्या भविष्यवाणीविषयी अवघ्या जगालाच कुतूहल वाटत आलेले आहे. भविष्यवाणी या गोष्टीबद्दल एकंदरच जगात प्रचंड कुतूहल असते. त्यामध्ये किती तथ्य असते याचा विचार बाजूला ठेवून निव्वळ काही तरी रंजक विषय म्हणूनही त्याकडे पाहिले जात असते. अशा भविष्यवाणीवर विश्वास नसला तरी त्याविषयीचे अनेकांचे कुतूहल काही कमी होत नाही. जगात काही भविष्य व्यक्त करणार्‍या प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या. त्यामध्येच बाबा वेंगा या अंध महिलेचा समावेश आहे. तिच्या या वर्षाबाबतच्या चार भाकितांबाबत जगातील अनेकांना कुतूहल वाटते.

बाबा वेंगा नावाची एक आजी होऊन गेली. बल्गेरियन भाषेत याचा अर्थ होतो 'वेंगा आजी'. या आजींबद्दल वाचण्याआधी त्यांनी व्यक्त केलेल्या भविष्यवाणींची माहिती घेऊ. त्यांनी 2022 सालासाठी एकूण 6 भविष्यवाणी केल्या आहेत. त्यात वर्तवलेल्या दोन भविष्यवाण्या खर्‍या ठरल्या आहेत. त्या दोन भविष्यवाणी म्हणजे आशियातील काही देशांना पुराचा सामना करावा लागेल. भारत आसाममधील पुराचा नुकताच सामना करत होता. बांगलादेश, थायलंड या देशांनाही पुराने झोडपून काढले.

त्यांची अजून एक भविष्यवाणी म्हणजे काही ठिकाणी पाण्याची टंचाई भासेल. इटली सध्या प्रचंड मोठा दुष्काळ बघत आहे. पोर्तुगाल तसेच इतरही अनेक ठिकाणी ही समस्या आहेच. उरलेल्या चार भविष्यवाणी म्हणजे, सैबेरियामधून एक नवा व्हायरस जगात धुमाकूळ घालेल, यावर्षी पृथ्वीवर एलियन्स हल्ला करतील, लोकस्ट नावाचा किडा पिकांवर हल्ला करेल आणि व्हर्च्युअल रियालिटीचा वापर वाढेल. आता डिसेंबरपर्यंत हे खरे ठरतील म्हणून या बाबा वेंगावर पूर्ण विश्वास असलेले लोक टेन्शनमध्ये आहेत.

बाबा वेंगाच्या आधीही अनेक भविष्यवाणी खर्‍या झाल्या आहेत. ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होतील, इंदिरा गांधी पंतप्रधान होतील अशा अनेक गोष्टी त्यांच्या खर्‍या ठरल्या आहेत. तेव्हापासून बाबा वेंगाभोवती वलय तयार झाले. तसेच 2021 साली पिकांवर टोळधाड येईल आणि त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होईल अशीही एक भविष्यवाणी खरी ठरली होती, असे म्हटले जाते. या वेंगाने 5079 पर्यंतची भविष्यवाणी सांगून ठेवली आहे. त्यापुढील काळाची भविष्यवाणी करण्याचा विषयच नाही, कारण जग त्यावर्षी संपणार आहे असेही त्यांनी सांगून ठेवले आहे. बल्गेरिया या देशात 1911 साली त्यांचा जन्म झाला.

वेंगेलिया पांडेवा गश्तेरोवा हे त्यांचे पूर्ण नाव. वय जेमतेम 10-12 वर्षे असेल तेव्हा एका मोठ्या वादळात त्या सापडल्या आणि त्यातच त्यांची द़ृष्टी गेली. त्यांना वर्तमान तेव्हा दिसत नसले तरी भविष्य दिसते असा दावा केला जाऊ लागला. सुरुवातीला तर काही त्यांच्याकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही. मात्र, जेव्हा काही गोष्टी खर्‍या ठरल्या तेव्हा मात्र त्यांचे अनुयायी तयार व्हायला लागले. असे सांगितले जाते की आजवर त्यांच्या 75 % भविष्यवाणी खर्‍या ठरल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news