

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या दुसर्या टप्प्यातील भरती प्रक्रियेस सुरुवात झाली असून, 320 पदांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेसाठी 28 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली. महापालिकेकडून पहिल्या टप्प्यातील 448 पदांची भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. यामध्ये सहायक विधी अधिकारी, सहायक अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, लिपिक अशा विविध पदांचा समावेश होता. उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या देखील देण्यात आल्या.
दरम्यान, महापालिकेत अजूनही काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेने दुसर्या टप्प्यातील भरती प्रक्रिया राबवली आहे. यासाठी पालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-1 ते वर्ग-3 मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन या विभागांतील पदांसाठी ही भरती असणार आहे.
महापालिका भरणार 320 पदे
क्ष-किरणतज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) (8 पदे)
वैद्यकीय अधिकारी/ निवासी वैद्यकीय अधिकारी (20 पदे)
उपसंचालक (प्राणिसंग्रहालय) (1 पद)
पशुवैद्यकीय अधिकारी (2 पदे)
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सीनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/
विभागीय आरोग्य निरीक्षक (20 पदे)
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (10 पदे)
आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इन्स्पेक्टर (40 पदे)
वाहन निरीक्षक/व्हेईकल इन्स्पेक्टर (3 पदे)
औषधनिर्माता (15 पदे)
पशुधन पर्यवेक्षक (लाइव्ह स्टॉक सुपरवायझर) (1 पद)
अग्निशमन विमोचक/फायरमन (200 पदे)