जम्मू काश्मीरच्या विधानसभा लोकसभेदरम्यान न घेण्याचं कारण? मुख्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण

जम्मू काश्मीरच्या विधानसभा लोकसभेदरम्यान न घेण्याचं कारण? मुख्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूकही या लोकसभा निवडणूकांसोबत होतील अशा चर्चा होत्या. मात्र आज लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या निवडणूका लोकसभेनंतर होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव राजीव कुमार यांनी दिली. ही माहिती देत असताना त्यांनी जम्मू काश्मीर मधील विधानसभा स्वतंत्र का घेण्यात येतील याबाबत सविस्तरपण सांगितले. Jammu and Kashmir Election

निवडणूक आयोगाने आज शनिवारी (दि.१६) लोकसभा निवडणुकीसोबतच चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक ही लोकसभेनंतर होईल अशी घोषणा आयोगाने केली. दोन्ही निवडणुका एकाच वेळी न घेण्याचे प्रमुख कारण म्हणजे पुरेशा सुरक्षा दलांचा अभाव असल्याचे कुमार यांनी सांगितले. Jammu and Kashmir Election

निवडणुकीच्या वेळी पुरेसे सुरक्षा दल आवश्यक | Jammu and Kashmir Election

कुमार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, सर्व राजकीय पक्षांनी केंद्रशासित प्रदेशात दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याची विनंती केली होती, परंतु सर्व प्रशासकीय यंत्रणांनी ते शक्य नसल्याचे सांगितले आहे. लोकसभा निवडणुका या देशभरात पार पडणार आहेत. अशा वेळी प्रत्येक राज्यात सुरक्षाव्यवस्था सुरळीत असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक मतदारसंघावर करडी नजर ठेवणे हे जोखमीचे आहे. अशा परिस्थितीत जम्मूमध्ये विधानसभा घेणे यासाठी सुरक्षाव्यवस्थेसमोर अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कुमार यावेळी म्हणाले.

450-500 सैनिकांच्या 1,000 कंपन्यांची आवश्यकता | Jammu and Kashmir Election

ते पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीर विधानसभेत उमेदवारांची संख्या खूप जास्त असेल. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांना सुरक्षा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुरेसे सुरक्षा दल उपलब्ध होणार नाही.  प्रत्येक 90 विधानसभेच्या जागांसाठी 10-12 उमेदवार उभे राहिले तरी सुमारे 1,000 उमेदवार असतील. सुरक्षेसाठी सुमारे 450-500 सैनिकांच्या 1,000 कंपन्यांची आवश्यकता असेल.

लोकसभेनंतर सुरक्षा दल उपलब्ध होईल त्यानंतर लगेचच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायद्यात विधानसभेच्या 107 जागांसाठी तरतूद आहे, त्यापैकी 24 पीओकेसाठी राखीव आहेत. नंतर पीओकेमधील 24 जागांसह परिसीमनमधील जागांची संख्या 114 करण्यात आली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news