

नगर : पुढारी डिजिटल : ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांना धमकीचा व्हीडियो आल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. ही धमकी श्रीरामपूर तालुक्यातील वडगाव येथील संतोष गायधने या व्यक्तीने दिल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संतोषला पोलिसांनी श्रीरामपूर येथून ताब्यात घेतलं आहे. नाशिकचे महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
शेतीच्या प्रकरणातून अन्याय झाल्याने तसेच या प्रकरणात कुटुंबावर दबाव येत होता. कुटुंब भीतीच्या छायेत असल्याने याप्रकरणी मध्यस्थी करण्याचं निवेदन संतोष यांनी पोलिस आणि आण्णा हजारे यांना दिले होते. पण आण्णा यांनी या निवेदनाची दखल घेतली नव्हती. या नैराशयातून संतोष यांनी 1 मे ला राळेगणसिद्धी येथे जाऊन आण्णा हजारे यांची हत्या करणार अशी धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. याशिवाय न्याय मिळत नसल्याने राष्ट्रपतींकडे इच्छामरणाचा अर्जही केला होता.