

पुढारी ऑनलाईन डेस्क : खारघर दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी – शरद पवार खारघरमध्ये निष्पाण लोकांनी जीव गमावला. सरकारची निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. या कार्यक्रमाची जबाबदारी सरकारची होती. या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हायला हवी, गर्दी जमवून अनुकुल वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईत विभागीय कार्यकर्ता शिबीर पार पडले. यावेळी शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, महागाईच्या प्रश्न, बेकारीचा प्रश्न आहे. तरुणांना नोकरी मिळत नाही. या देशातील अन्नदाता गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी उध्वस्त झालेला आहे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे होते. शैक्षणिक कामांसाठी लोक देणगी देतात. समजा अनिल देशमुख यांनी १ कोटींची देणगी दिली. त्यासाठी त्यांना १३ महिने तुरुंगावास भोगावा लागला. नवाब मलिक यांच्या बाबतीतही असाच प्रकार सुरू आहे. मलिक आमच्या पक्षाची ठोस भूमिका मांडतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.