

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये पडणार वादाची पहिली ठिणगी, कारण काय तर जेवण बनवणे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली आहे. आणि याच वरून दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. अमृता म्हणते, 'तेजस्विनी तू आता काय करते आहेस ? त्यावर तेजस्विनी म्हणाली, "राग तू जेवणावर काढतेस आहेस मी बनवणार नाही ही पध्द्त नव्हे त्यावर अमृताचा पारा चढला "हो हीच पद्धत आहे आता" असे अमृताने तेजस्विनीला ठणकावून सांगितले.
तेजस्विनीचे म्हणणें आहे, "अरे रा वीची भाषा नको करुस, हाय वे माय वे मला नाही चालतं." अमृता स्वतःशी बोलताना म्हणाली, "सगळ्यांचीच मनधरणी करायला आली आहे मी." घरामध्ये झाल्या प्रकारामुळे अमृताला अश्रू अनावर झाले. बघूया आजच्या भागामध्ये या दोघींमधील भांडणं मिटेल कि अजूनच वाढेल?