Election Commission : निवडणूक आयोगाचे ६ राज्यांतील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश
पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) हटवण्यासाठी आवश्यक कारवाई देखील केली आहे. Election Commission
निवडणुकांमध्ये समतोल राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या या कार्यवाहीमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळणार आहे, असा संदेश गेला आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांनाही हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर मिझोराम आणि हिमाचल प्रदेशचे जीएडी सचिवही हटवण्यात आले आहेत. Election Commission
देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. देशभरात ७ टप्प्यात निवडणुका होणार असून ४ जूनरोजी निकाल लागणार आहेत. १६ मार्च रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करून निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले होते.
हेही वाचा
- Himachal Pradesh Political Crisis | हिमाचलच्या 'त्या' ६ बंडखोर काँग्रेस आमदारांना धक्का, अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास SC चा नकार
- Lok Sabha Karnataka Election 2024: कर्नाटकात भाजपकडे जागा राखण्याचे आव्हान; बेळगाव आणि चिकोडी मतदारसंघांत 'हायव्होल्टेज' लढती
- Lok Sabha Election 2024 | कोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे, हातकणंगलेत राजू शेट्टींशी चर्चा, संजय राऊतांची माहिती

