

पुढारी ऑनलाइन डेस्क : Kite Festival : देशभरात संक्रांतीनिमित्त पंतगांचा उत्सव शिगेला पोहोचला आहे. मार्केटमध्ये विविध आकाराचे, चित्रांचे, नक्षीकाम, लहान मुलांसाठी कार्टून, मुलींसाठी बार्बी डॉलच्या पतंग पाहिल्या आहेत. मधल्या काळात चित्रपटातील सेलिब्रिटी देखील पतंगांवर अवतरले. मात्र, यंदाच्या पतंगांवर सर्वात जास्त छाप ही नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि बाबा रामदेव यांच्या छायाचित्रांनी घेतली आहे.
Kite Festival : गुजरातमध्ये ही क्रेझ सर्वात जास्त दिसून येत आहे. गुजरातच्या वडोदरा मार्केटमधील पतंगांच्या स्टॉलमध्ये मोदी आणि रामदेव बाबांचे छायाचित्र असलेले पतंग प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. तर योगी आदित्यनाथ देखील पतंगावर झळकले आहे.
पाहा मार्केटमधील विविध ढंगी आकर्षक पतंग
हे ही वाचा :