मॅकअॅफीच्या अहवालानुसार, 69 टक्के भारतीय नागरिक हे मानवी आवाज आणि एआयनिर्मित आवाजातील फरक ओळखण्यास असमर्थ ठरले आहेत. त्याचेवळी द आर्टिफिशियल इम्पोस्टरच्या अहवालानुसार 47 टक्के भारतीयांना त्याचा फटका बसला आहे किंवा व्हॉइस क्लोनिंगला बळी पडलेल्या लोकांना ते ओळखत आहेत. जागतिक पातळीवर अशारितीने फसलेल्या लोकांची संख्या 25 टक्के आहे. याशिवाय एनसीआरबीच्या अहवालानुसार 2022 मध्ये 65,893 सायबर गुन्हे नोंदले गेले. त्याचवेळी 2021 मध्ये 52,974 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यात सर्वाधिक सुमारे 65 टक्के प्रकरणे फसवणुकीची आहेत. विशेष म्हणजे, आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच ठगही स्मार्ट असतात. फसवण्याची पारंपरिक पद्धत सोडून ते ऑनलाइनवर सहजपणे फसवणूक करत आहेत. व्हॉईस क्लोनिंगमुळे फसवणूक होण्याची शक्यता सर्वाधिक राहते. कारण, या तंत्रापासून बहुसंख्य मंडळी अनभिज्ञ असतात.