संकरीत गाईच्या माध्यमातून थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म

संकरीत गाईच्या माध्यमातून थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म
Published on
Updated on

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषि महाविद्यालय, पुणे येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच संकरीत गाईच्या माध्यमातून थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म झाला असल्यांची माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.

भ्रूण प्रत्यारोपण थारपारकर कालवड प्रयोगशाळेमध्ये थारपारकर 133 नंबरची दातागाई वापरली असून तिची दूध उत्पादन क्षमता प्रतिवेत 3293 किलो आहे. तसेच दाता वळू म्हणून थारपारकर फेथफुल नावाचा वळू वापरला. वळूच्या आईचे दूध उत्पादन प्रतिवेत 3005 किलो आहे. दुधातील स्नि1/2 धांश 4.8% आहे. भ्रूण प्रयोगशाळेतून तयार करून सात दिवसानंतर देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये असलेल्या संकरित गायीमध्ये प्रत्यारोपण केला आहे. प्रत्यारोपणाचे गाई दि. 17 जुलै, 2023 रोजी व्याली आहे.

वासराचे जन्मता वजन 21 किलो भरले आहे. हा प्रकल्प शासनाने सन 2020-2024 या कालावधीसाठी मंजूर केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून साकारला आहे. शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकर्‍यांच्या गोठयामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रायोगिक तत्वावरती वापरण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकल्पांतर्गत सुमारे 150 पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांनी दिली. सदर तंत्रज्ञान राहुरी सीमेन स्टेशन (एनडीडीबी) यांच्या मार्फत राबविण्यात येत असून उच्च वंशावळीच्या देशी गोवंशाची संख्या वाढवण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे.

संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कृषि महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांनी सर्व शास्त्रज्ञाचे अभिनंदन करून समाधान व्यकक्त केले. तंत्रज्ञान म्हणजे काय? उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगला अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे व तयार झालेल्या फलितांडाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गायीमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ करणे व त्यापासून उच्च दर्जाचे वासरू मिळवणे.

सदर प्रकल्प महाराष्ट्रातील गोपालकांसाठी अत्यंत महत्वाचा असून देशी गाईया दुध उत्पादन क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास या संशोधन केंद्रामध्ये होत आहे. सदर प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सन 2020-2024 या कालावधीसाठी मंजूर केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सदर प्रकल्प साकारला आहे. मे 2022 रोजी या संशोधन केंद्रावर देशी गाईचे गोधन 2022 हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news