Eknath Shinde Dasara Melava : एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक १० मुद्दे

Eknath Shinde Dasara Melava : एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक १० मुद्दे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा  आज (दि.२४)आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ‍ठाकरे यांच्यावर हल्‍लाबोल केला. जाणून घेवूया एकनाथ शिंदे त्‍यांच्‍या भाषणातील ठळक मुद्दे (Eknath Shinde Dasara Melava 2023)

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हेच आमचे शिवतीर्थ

काेणत्‍या मैदानावर दसरा मेळावा घेतला हे महत्त्‍वाचे नाही. विचार महत्त्‍वाचा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हेच आमचे शिवतीर्थ. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्‍यांना नाकारले त्‍यांचे तळवे चाटण्‍याचे काम तुम्‍ही करताय.आता जनताच ठरवेल की महागद्दार काेण? बाळासाहेब ठाकरेंच्‍या हिंदूत्‍वाचा गळा घाेटलेले तुम्‍हाला चालणार आहे का?, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. (Eknath Shinde Dasara Melava 2023)

रक्‍ताचा नाते सांगणार्‍यांनीच बाळासाहेबांच्‍या विचारांचा गळा घाेटला

बाळासाहेबांनी हिंदुत्त्‍वासाठी मतदानाचा हक्‍क गमावला. मात्र त्‍यांनी कधीच हिंदुत्त्‍व साेडले नाहीत. ज्‍यांनी बाळासाहेबांचा मतदानाचा हक्‍क हिरावला त्‍यांच्‍यासोबत तुम्‍ही सोबत केली आहे. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आम्‍ही कधीच तडजाोड करणार नाही. रक्‍ताचा नाते सांगणार्‍यांनीच बाळासाहेबांच्‍या विचारांचा गळा घाेटला आहे. केवळ सत्तेसाठी त्‍यांनी हिंदुत्त्‍वाच्‍या विचाराशी तडजाोड केली.त्‍यांचा दसरा मेळावा नाही. त्‍यांचा शिमगा आहे. वर्षभर ते एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍या नावाने शिमगा करतात. त्‍यांनी त्यांचा मेळावा शिमग्या दिवशी घ्यावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

हे महाशय टुनकन उडाले आणि मुख्‍यमंत्रीपदाच्‍या खुर्चीत जावून बसले

शिवसैनिकाला मुख्‍यमंत्री करण्‍याचे  बाळासाहेब ठाकरेंचे स्‍वप्‍न हाेते. मात्र हे महाशय टुनकन उडाले आणि मुख्‍यमंत्रीपदाच्‍या खुर्चीत जावून बसले. एका चेहर्‍यामागे अनेक चेहरे आहेत. याच्‍या पाेटात एक आणि ओठात एक असे आहे. हे सत्तेसाठी संधीसाधू बनले, असा आराेप करत याेग्‍यवेळी खूप काही सांगेन, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला. (Eknath Shinde Dasara Melava 2023)

शेतकर्‍याच्‍या मुलाने हेलिकाॅप्‍टरमधून फिरु नये का?

बाळासाहेबांच्‍या विचारांचा झंझावात येथे दिसत आहे. मी आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ताच राहणार आहे. एका सर्वसामान्‍य शेतकर्‍यांच्‍या कुटुंबातील मुलगा मुख्‍यमंत्री झाला म्‍हणून तुम्‍हाला एवढा पाेटशुळ का उठला आहे? शेतकर्‍याच्‍या मुलाने हेलिकाॅप्‍टरमधून फिरु नये का? साेन्‍याचा चमचा घेवून जन्‍माला आलेल्‍यानेच मुख्‍यमंत्री व्‍हावे, असा नियम आहे का?, असा सवालही त्‍यांनी केला.

लाखो शिवसैनिकांमुळे तुमची मक्‍तेदारी होती

बाळासाहेबांची हिंमत घेवून मी धाडसाने मुख्‍यमंत्री झालाे आहे. त्‍यांना वाटते त्‍यांची मक्‍तेदारी आहे. तुमची मालकी कोणामुळे आहे. लाखो शिवसैनिकांमुळे तुमची मक्‍तेदारी होती. तुमची मालकी नाही, असेही त्‍यांनी सुनावले.

तुम्‍ही गहाण टाकलेली शिवसेना मी साेडवली हे पाप आहे का?

जसे मोगलांच्‍या काळात घोड्यांनाही पाणी पिताना संताजी-धनाजी दिसायचे तसेच तुम्‍हाला प्रत्‍येकवेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे दिसताे का? मी सामान्‍य माणसांचा शिवसैनिक आहे. तुम्‍ही गहाण टाकलेली शिवसेना मी साेडवली हे पाप आहे का?.

एकनाथ शिंदे आता मागे हटणार नाही

मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचे सरकार आणले. पूर्वी तुम्‍ही सरकार पडणार असे म्‍हणत हाेता. आम्‍हाला विकासासाठी अजित पवार यांची साथ मिळाली. आम्‍हाला आता २०० हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. आता तुम्‍ही मुख्‍यमंत्री बदलणार, असे दरराेज सांगता. मी कधीच पदासाठी काम करत नाही. तुम्‍ही  कितीही काही केली तरी हा एकनाथ शिंदे आता मागे हटणार नाही, असा निर्धारही एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. 

तुम्‍ही बाळासाहेबांचे हाेवू शकत नाही. तुम्‍ही आमचे काय हाेणार?

अनंत दिघे यांनी राज ठाकरे यांची स्‍तुती केली. त्‍यामुळे तुम्‍ही तत्‍काळ अनंत दिघे यांचे पंख छाटण्‍यास सुरुवात  केली.तुम्‍ही बाळासाहेबांचे हाेवू शकत नाही. तुम्‍ही आमचे काय हाेणार? ही सभा बाळासाहेबांच्‍या शिवसैनिक मर्दांची आहे. तिकडे सभा हुजरे, मुनीम आणि कारकुनाची आहे, अशी बाेचरी टीकाही त्‍यांनी केली.  (Eknath Shinde Dasara Melava 2023)

पंतप्रधान माेदी आ‍‍‍णि केंद्रीय गृहमंत्री शहांचा महाराष्‍ट्र सरकारला भक्‍कम पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र माेदी आ‍‍‍णि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्‍ट्र सरकारला भक्‍कम पाठिंबा आहे. नरेंद्र माेदी जेव्‍हा मुंबईत येतात तेव्‍हा यांना पाेटदुखी हाेते. त्‍यामुळे बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरु केले आहेत. त्‍यांनी तेथे जावे.  तुम्‍ही कितीही काही केले तरी आगामी २०२४ लाेकसभा निवडणुकीत नरेंद्र माेदी यांचाच विजय हाेणार आहे. महाराष्‍ट्रातून महायुतीचे ४५ खासदार निवडून येतील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Eknath Shinde Dasara Melava :  मराठा आरक्षण टिकणारे आरक्षण देणार

वेंद्र फडणवीस मुख्‍यमंत्री असतानाच आम्‍ही मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र सर्वोच्‍च न्‍यायालयात ते टिकले नाही. काेणावरही अन्‍याय न करता मराठा आरक्षण टिकणारे आरक्षण देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेवून सांगताे कीु, माझ्‍या रक्‍तातील शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्‍न साेडवणार, अशी ग्‍वाही देत या प्रश्‍नी काेणीही टाेकाचे पाउल उचलू नका. हे सरकार तुमचे आहे. देआता आरक्षणाच्‍या नावाखाली जाती-जातींमध्‍ये तेढ निर्माण करण्‍याचे षडयंत्र सुरु असून ते हाणून पाडा, असे आवाहनही मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी केले. (Eknath Shinde Dasara Melava 2023)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news