ओतूर : म्हशी घेऊन जाणारा टेम्पो उलटला; आठ म्हशी जागीच ठार

ओतूर : म्हशी घेऊन जाणारा टेम्पो उलटला; आठ म्हशी जागीच ठार
Published on: 
Updated on: 

ओतूर(ता.जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : कल्याण – नगर महामार्गावरील गायमुखवाडी गावच्या हद्दीत ओतूरच्या दिशेकडून आळेफाट्याच्या दिशेने म्हशी घेऊन जाणारा टेम्पो ( एम एच ०३ डी व्ही ५७२० ) उलटल्याने टेम्पोत भरलेल्या १० म्हशींपैकी ८ म्हशी जागीच ठार झाल्या तर चालक व आणखी एकजण जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेंपो उलटला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता तळपाडे, संदीप भोते, शाम जायभाय, अमोल पालवे घटनास्थळी हजर झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश खिल्लारी व डॉ. कैलास लुधरकर यांनी म्हशींची तपासणी करून ८ म्हशी मृत असल्याचे घोषित केले .याबाबत अधिकचा तपास ओतूर पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news