Accenture Plc lay off | जगात आर्थिक मंदी! 'ही IT कंपनी देणार १९ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : माहिती आणि तंत्रज्ञान (IT) सेवा देणारी Accenture Plc कंपनीने तब्बल १९ हजार नोकऱ्या कमी करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या कंपनीने वार्षिक महसूल आणि नफ्याच्या अंदाजात कपात केली आहे. जागतिक स्थरावरील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने नोकरकपात केली जात असल्याचे नमूद केले आहे. ही नोकरकपात कंपनीच्या एकूण मनुष्यबळाच्या २.५ टक्के एवढी आहे. (Accenture Plc lay off)
“पुढील १८ महिन्यांत सुमारे १९ हजार लोक (आमच्या सध्याच्या कर्मचार्यांपैकी २.५ टक्के) कंपनीतून बाहेर पडतील आणि यापैकी निम्म्याहून अधिक लोक आमच्या non-billable कॉर्पोरेट फंक्शन्समधील असतील,” अशी माहिती कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये दिली आहे. कंपनीला आता वार्षिक महसूल वाढ ८ टक्के ते १० टक्क्यांच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे, जी पूर्वी ८ टक्के ते ११ टक्के अपेक्षित होती. कंपनीने आता प्रति शेअर कमाई ११.२० डॉलर ते ११.५२ डॉलरच्या पूर्वीच्या तुलनेत १०.८४ डॉलर ते ११.०६ डॉलर या श्रेणीत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, Accenture ने २८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले. त्यात १५.८ अब्ज डॉलर महसूल दाखण्यात आला आहे. तिसर्या तिमाहीत महसूल १६.१ अब्ज डॉलर आणि १६.७ अब्ज डॉलरच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Accenture plc ही आर्यलँडच्या डब्लिन स्थित असलेली व्यावसायिक सेवा कंपनी आहे. ही कंपनी माहिती तंत्रज्ञान आणि कन्सल्टिंग सेवा देते. (Accenture Plc lay off)
Accenture Plc, the Irish-American IT company has announced to slash its working force by 19,000.
This comes amid a worsening global economic outlook and the firing spree across the IT sector#layoffs https://t.co/SVaKFryPOk
— WION (@WIONews) March 23, 2023
हे ही वाचा :
- Go Mechanic Lay offs | स्टार्टअप्सना ग्रहण : आता गो मेकॅनिकमध्ये ७० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ
- Google layoffs : सहका-यांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ 250 कर्मचा-यांचे गुगलमधून ‘वॉक आउट’