Motorola Edge 30 Pro भारतात लॉन्च , काय आहे त्यास खास

Motorola Edge 30 Pro भारतात लॉन्च , काय आहे त्यास खास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क  

Motorola Edge 30 Pro हा मोबाईल आज भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन 2021 ला चीनमध्ये लॉन्च झालेल्या Moto Edge X30 ची दुसरी आवृत्ती असल्याचे कंपनीने सांगितले आहे. Motorola Edge 30 Pro Qualcomm Snapdragon 8 Gen मधील हा फोन आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर एका टीझरद्वारे हा मोबाईल लॉन्च केला आहे.

Motorola Edge X30 सारखे, Motorola Edge 30 Pro मध्ये 6.7 इंच फुल HD + OLED डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये 144Hz चा रिफ्रेश दर असेल असे कंपनीकडून सांगितले जात आहे.

कॅमेरा

तसेच, यामध्ये पाठीमागे तीन-कॅमेरे असणार आहेत. यामध्ये 50MP, 50MP अल्ट्रा-वाइड शूटर आणि 2MP डेप्थ सेन्सरची शक्‍यता आहे. तर सेल्फी कॅमेरा 60MP असेल.

बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी असून 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

किंमत

भारतात याची किंमत 40 हजारांपासून सुरू होवू शकते. परंतु गेल्या आठवड्यात कंपनीने दिलेल्‍या माहितीनुसार फोनची किंमत 49,999 रुपये असू शकते.

हे ही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news