TCS CEO & MD Rajesh Gopoinathan : ‘टीसीएस’चे सीईओ आणि एमडी राजेश गोपीनाथन यांचा राजीनामा; हे आहेत नवीन सीईओ…

TCS CEO & MD
TCS CEO & MD
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : टीसीएसचे (टाटा कन्सलटन्सी ऑफ सर्व्हिसेस) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा 15 सप्टेंबर 2023 पासून अंमलात येईल. गोपीनाथान हे गेल्या सहा वर्षापासून टीसीएसचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या जागी के क्रितिवासन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तात्काळ प्रभावाने नियक्ती केली आहे. टीसीएसच्या संचालक मंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.

TCS CEO&MD Rajesh Gopoinathan : टीसीएस ने गोपीनाथन यांच्याबद्दल सांगितले की, संचालक मंडळाने त्यांच्या विनंतीचा विचार केला आहे आणि ती स्वीकारली आहे. श्री गोपीनाथन हे त्यांच्या उत्तराधिकार्‍यांना संक्रमण आणि समर्थन प्रदान करण्यासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीमध्ये कार्यरत राहतील.

गोपीनाथन यांनी याविषयी सांगितले की, "माझ्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात मला काय करायचे आहे याबद्दल मी काही कल्पना मांडत आहे. सखोल चिंतन केल्यानंतर आणि अध्यक्ष आणि मंडळाशी चर्चा केल्यानंतर, मी ठरवले की या आर्थिक वर्षाचा शेवट माझ्यासाठी चांगला काळ आहे. त्यामुळे मी आता जबाबदारीतून बाहेर पडू शकतो. गेल्या दोन दशकांमध्ये क्रितीसोबत काम केल्यामुळे, मला विश्वास आहे की त्याचे नेतृत्व संघासह टीसीएसला अधिक उंचीवर नेण्यासाठी सध्या सर्वोत्तम स्थितीत आहे."

TCS CEO&MD Rajesh Gopoinathan : के क्रितीवासन यांची कारकीर्द…

के क्रितीवासन यांनी मद्रास विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री आणि IIT कानपूरमधून औद्योगिक आणि व्यवस्थापन अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते 1989 मध्ये टाटा कन्सलन्सीमध्ये रुजू झाले. त्यांना टीसीएसमध्ये 34 वर्षांहून अधिक काळ झाला आहे.

के क्रितिवासन सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) व्यवसाय समूहाचे अध्यक्ष आणि जागतिक प्रमुख आहेत. नवनियुक्त सीईओ कृतिवासन हे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राचा भाग आहेत. TCS मधील त्यांच्या दीर्घ कार्यकाळात, त्यांनी वितरण, ग्राहक संबंध व्यवस्थापन, मोठ्या कार्यक्रम व्यवस्थापन आणि विक्रीमध्ये विविध नेतृत्व भूमिका पार पाडल्या आहेत.

कृतिवासन हे TCS Iberoamerica, TCS आयर्लंड आणि TCS टेक्नॉलॉजी सोल्युशन्स AG च्या पर्यवेक्षी मंडळाचे संचालक मंडळाचे सदस्य देखील आहेत."ते पुढील आर्थिक वर्षात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारतील, अशी माहिती टीसीएसने दिली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news