Tamannah Bhatia : तमन्नाचा रॅम्पवॉक म्हणजे अंडरटेकरचं चालणं; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Tamannah Bhatia : तमन्नाचा रॅम्पवॉक म्हणजे अंडरटेकरचं चालणं; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) नेहमी सोशल मीडियावर ट्रेंडिंगला असते. सध्या ती तिच्या एका फॅशन वॉकमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिच्या रॅम्पवॉकला ट्रोल केले जात आहे. तमन्नाचा मर्दानी रॅम्पवॉक अशा कमेंट तिच्या फोटोवर येत आहेत. काहींनी तर तमन्नाचं चालणं आणि अडरटेकरचे चालणे यात काहीच फरक नाही अशा कमेंट दिलेल्या आहेत. तिला अंडरटेकरची उपमा दिल्याने हा विषय चर्चेत आला आहे.

तमन्ना भाटियाने प्रतिष्ठित लॅक्मे फॅशन वीक रॅम्पवर वॉक केले. या फॅशन वीकमधील रॅम्प वॉकमुळे ती चर्चेत आली आहे. अष्टपैलुत्वाचे प्रदर्शन करणाऱ्या या अभिनेत्रीने जोरदार सुशोभित केलेला लेहेंगा फ्लॉंट केला. या लेहेंग्यावर तिने फॅशन वॉक केला. तिच्या या वॉकवर सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट केलेल्या आहेत. मात्र काही लोकांनी तिला ट्रोल केल्याचे पहायला मिळाले.

तमन्नाचा लेहेंग्यातील लुक

तमन्नाने विवानी या फॅशन लेबलमध्ये एक आकर्षक असा लेहेंगा परिधान केला होता. हा लेहेंगा मोत्याने सजवलेला होता. तमन्ना तिच्या ब्लाउजमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या ओल्या केशरचना, स्मोकी डोळे, हायलाइट केलेले आणि लाल झालेले गाल त्याचबरोबर चकचकीत लिपस्टिकमुळे तिचा लुक आकर्षित करणारा होता.

तमन्नावर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट

तमन्ना भाटियाचा LFW वॉक ड्रॉ फ्लॅक दिवा रॅम्पवरनंतर नेटिझन्सच्या नजरेतून ती उतरली असल्याचे सोशल मीडियावरील कमेंटवरुन दिसून येत आहे. तिच्या रॅम्प वॉकमुळे टीकेची लाट उसळली. एका युजरने लिहिले की, "ती अंडरटेकर किंवा रोमन राजासारखी चालत आहे." "तिची काय चूक आहे.. ती अंडरटेकरसारखी चालत आहे," दुसऱ्या युजरने लिहिले. "मर्दो जैसा चल रही है…" या कमेंटवरुन आता तमन्नाला ट्रोल केल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news