

तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा: तळेगाव दाभाडे, मावळ परिसरात छोट्यामोठ्या रस्त्यांप्रमाणेच अगदी महामार्गांवरही दुचाकीप्रमाणेच चारचाकी वाहनचालकांकडून गाड्या चालवताना सर्रासपने मोबाइलचा वापर केला जातो. हे अत्यंत धोकादायक असून,असे वाहनचालक स्वत:बरोबरच पादचारी व अन्य चालकांचाही जीव धोक्यात आणत आहेत. मोबाईलमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
अनेकदा मोबाईलवर संभाषण चालु असताना पलीकडून मनासारखेच बोलणे होईलच असे सांगता येत नाही. कधी कधी मनाविरुध्द बोलणे ऐकावे लागते यामुळेही वाहनावरचे नियंत्रण सुटून अपघाताची शक्यता असते. तरी वाहतूक नियंत्रण पोलीसांनी योग्य ती कार्यवाही करुन असे प्रकार आटोक्यात आणावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.