

तळेगाव: स्टेशन परिसरात रात्रभर संततधार पाऊस होता. मंगळवारी पहाटे ४.३० च्या सुमारास तळेगाव स्टेशन भागातील वीज पुरवठा लाईन फॉल्ट झाल्यामुळे खंडीत झाला होता. यावेळी इंद्रायणी नगर येथे उच्च दाब वाहीनीची तार तुटली होती. तसेच पीन इन्शूलेटरही पंक्चर झाले होते. महाविरण कामगारांनी फॉल्टी भाग तातडीने ओपन करुन बाकीचा वीज पुरवठा सुरु करुन घेतला. भर पावसात तुटलेली तार आणि नवीन पीन इन्शूलेटर जोडून वीजपुरवठा सकाळी नऊच्या दरम्यान नेहमीप्रमामाणे सुरळीत केला. यावेळी संदीप सरवदे, नरेंद्र भुईंगळ, सतीश गांजरे, राहुल जाधव, लहू गावडे यांनी काम केले.