

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडने दिलेल्या १६८ धावांचा पाढलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. अवघ्या २४ धावांमध्ये निम्मा संघ तंबूत परतला. न्यूझीलंड संघाच्या भेदक मार्यासमोर श्रीलंकेचे फलंदाजांनी लोटांगण घातले. सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय मिळवत ग्रुप 'ए' च्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थनी झेप घेतली आहे. (NZ vs SL)
न्यूझीलंडने दिलेल्या १६८ धावांचा पाढलाग करताना पाठलाग करताना श्रीलंकेला एका पाठोपाठ एक तीन धक्के बसले. श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज पथुम निसंका गोल्डन डक ( पहिल्याच चेंडूवर शून्य धावावर बाद होणे ) झाला. त्याला साउथीने पायचीत केले. दुसर्या षटकामध्ये कुसल मेंडिस याला ट्रेंड बोल्ट याने डेव्हॉन कॉनवेकडे ( यष्टीरक्षक ) झेल देणे भाग पाडले. यापाठोपाठ धनंजया डी सिल्वा याला बोल्डने त्रिफळाचीत केले.
सामन्याच्या चौथ्या षटकांत साऊथीने असलंकाला बाद करत लंकेला चौथा धक्का दिला. गोलंदाजीमध्ये साऊथीने एक तर बोल्टने श्रीलंकेचे तीन गडी बाद केले. चमिका करुणारत्ने याने ८ चेंडूत ३ धावा केल्या. मात्र मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर बोल्टने त्याला झेलबाद केले. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा एका पाठोपाठे एक गडी बाद झाल्याने संथ गतीने फलंदाजी करताना करूणारत्ने बाद झाला. त्याला फिरकीपटू सॅटनरने बाद केले. (NZ vs SL)
भानुका राजपक्षे याने श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने २२ चेंडूत ३४ धावा केल्या. मात्र लॉकी फर्ग्यूसनच्या गोलंदाजीवर त्याने कर्णथार केन विल्यमसनकडे सोपा झेल दिला. १० षटकांच्या खेळानंतर श्रीलंकेने ६ गडी गमावत ५८ धावा केल्या. वनिन्दु हसरंगा हा चार धावांवर खेळत असताना इश सोदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कर्णधार केन विल्यमसन याने हा झेल टीपला. हसरंगा पाठोपाठ महेश थीक्षाना शून्यवर झेलबाद झाला. १७ व्या षटकात शनाका ३५ धावांवर खेळत असताना बोल्टने मिचेस करवी त्याला बाद करत श्रीलंकेला ९ वा धक्का दिला.
सामन्यात सुरूवातीला न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एका बाजूने एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना फिलिप्सने केलेल्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने १६७ धावांरपर्यत मजल मारली.
पहिल्याच षटकात न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर महेश थीक्षानाने न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलन याला त्रिफळाचीत केले. फिन ऍलन बाद झाल्या न्यूझीलंड संघाला पाठोपाठ श्रीलंकेने दोन धक्के दिले. सामन्यातील तिसऱ्या षटकात डेव्हॉन कॉन्वे १ धाव करून बाद झाला त्याला धनंजय डी सिल्वाने बाद केले. तर, न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन सामन्याच्या चौथ्या षटकात ८ धावा करून माघारी फिरला, विलियमसनला कसून रजिथावने मेंडिसकरवी झेल बाद केले. (T20 World Cup NZ vs SL)
सामन्याच्या सुरूवातीलाच पाठोपाठ विकेट पडल्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी संथ गतीने फलंदाजी केली. यामध्ये मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी संथ गतीने फलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. सामन्याच्या पंधराव्या षटकांत मिचेल बाद झाल्यानंतर त्याच्या जागी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेला जेम्स नीशम चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याला सामन्याच्या अठराव्या व्या षटकांत रजिथाने ५ धावांवर बाद केले. एका बाजून न्यूझीलंडच्या विकेट पडत असताना मात्र, फिलिप्स दुसऱ्या बाजूने एक बाजूने श्रीलंकन गोलंदाजांना विरूध्द लढवत होता.
न्यूझीलंड संघाचा डाव सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या फिलिप्सने सामन्यात संयमी व आक्रमक अशा संमिश्र पध्दतीने खेळी करत संघाचा डाव सावरत ६१ चेंडूत आपले शतक साजरे केले. सामन्यात त्याने १६२ च्या सरासरीने ६४ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकार लगावत १०४ धावा केल्या.
हेही वाचा;