SL vs ENG T20 : इंग्लंडचा श्रीलंकेवर ४ गडी राखून विजय

SL vs ENG T20 : इंग्लंडचा श्रीलंकेवर ४ गडी  राखून विजय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत आज इंग्‍लंड विरुद्‍ध श्रीलंका यांच्यात सामना खेळवण्यात आहे. श्रीलंका यापूर्वी सेमीफायनलच्‍या स्‍पर्धेतून बाहेर पडला आहे. आज इंग्‍लंड संघाने सामना जिंकल्‍यास हा संघ सेमीफायनमध्‍ये धडक मारेल. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्‍लंडसमाेर १४२ धावांचे आव्‍हान ठेवले आहे. ८ गडी गमावत श्रीलंकेने १४१ धावा केल्‍या.

लिव्हिंगस्टोन पाठोपाठ मोईन अली बाद

सामन्यातील १३ व्या षटकांत इंग्लंडचा फलंदाज लिव्हिंगस्टोन ४ धावाकरून बाद झाला. त्याच्यी जागी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेला मोईन अली चांगली कामगिरी करू शकला नाही. तो १५ व्या षटकांत १ धाव करून बाद झाला.

इंग्लंडला पाठोपाठ तिसरा धक्का; हॅरी ब्रूक स्वस्त: माघारी

सामन्यात सलामीवीर फलंदाज हेल्स आणि कर्णधार यांनी सावध फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. पॉवर प्लेनंतर धावगती वाढवताना इंग्लडंचे फलंदाज पाठोपाठ बाद होत आहेत. आठव्या षटकात कर्णधार बटलर २८ धावाकरून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर हेल्सदेखील बटलर पाठीमागे फार धावा करू शकला नाही. या दोन्ही फलंदाजांना श्रीलंकेचा फिरकीपटू हसरंगाने बाद केले. हेल्स आणि बटलर बाद झाल्यानंतर स्टोक्स आणि ब्रूक हे फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. त्यापैकी ब्रूक ४ धावाकरून स्वस्तात बाद झाला. त्याला धनंजय डी सिल्वाने सामन्यातील १४ व्या षटकांत बाद केले.

हसरंगाने दिला इंग्लंडला दुसरा धक्का

पहिल्या पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी करत धावफलकावर ७० धावा लावणाऱ्या हेल्स सामन्यातील १० व्या षटकात बाद झाला. त्याला श्रीलंकेचा गोलंदाज हसरंगाने बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. हेल्स अर्धशतकाच्या उंभरट्यावर उभा असताना बाद झाला. त्याने ३० चेंडूत ४७ धावा केल्या.

इंग्लंडला पहिला धक्का; कर्णधार बटलर २८ करून बाद

सामन्यातील आठव्या षटकात इंग्लंडचा कर्णधार जोस बटवर बाद झाला. पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी करत असलेल्या बटलरने दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये धावगती वाढवण्यासाठी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. परंतु तो यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही. त्याला आठव्या षटकात श्रीलंकेचा गोलंदाज हसरंगाने बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला.

हेल्स आणि बटलरच्या खेळीमुळे इंग्लंड सुस्थिथित

बटलर आणि हेल्स यांनी दमदाऱ खेळी करत इंग्लंडला सुस्थित नेहले. या सलामीवीर जोडीने संथ गतीने फलंदाजी करत धावफलक हालता ठेवला. त्यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी केल्यामुळे श्रीलंकन गोलंदाजांना इंग्लंडची सलामीची जोडी फोडण्यात यश आले नाही. हेल्स आणि बटलर यांनी सावध फलंदाजी करत ६ षटकांमध्ये विनबाद ७० धावा केल्या

इंग्‍लंडची सावध सुरुवात

श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि ॲलेक्‍स हेल्‍स यांनी सावध सुरुवात केली. पाच षटकानंतर इंग्‍लडने विनाबाद ५० धावा केल्‍या आहेत. यामध्ये कर्णधार बटलरने १८ चेंडूत ३२ धावा केल्या तर ॲलेक्‍स हेल्‍सने १३ चेंडूत २३ धावा केल्या आहेत.

पथुम निसांकाचे अर्धशतक, इंग्‍लंडसमोर १४२ धावांचे आव्हान

श्रीलंकेने पहिल्‍या तीन षटकांमध्‍ये ३२ धावा फटकावत दमदार सुरुवात केली. मात्र  चाैथ्या षटकामध्‍ये १८ धावांवर खेळणार्‍या कुसल मेडिंस याला लियाम लिविंगस्टोन याने तंबूत धाडले. सहा षटकानंतर श्रीलंकेने १ गडी गमावत ५४ धावा केल्‍या आहेत. यानंतर नवव्या षटकामध्ये ९ धावांवर धनंजया डीसिल्वा याला सॅम करनने आऊ़ट केले. दहा षटकामध्ये श्रीलंकेने २ गडी गमावत ८० धावा केल्या आहेत. एका बाजुला  पथुम निसांका उत्कष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन करत असताना  ११ व्‍या षटकात ८ धावांवर खेळणार्‍या चरित असलंका  याला बेन स्टोक्सने बाद केले. ११ षटकामध्‍ये श्रीलंकेने ३ गडी गमावत ८४ धावा केल्‍या.

पथुम निसांका याने ३३ चेंडूत १ चाौकार, ४ षटकारांच्‍या साहाय्‍याने आपलं अधर्धशतक पूर्ण करत श्रीलंकेचा डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. १३ षटकामध्‍ये ३ गडी गमावत श्रीलंकेने १०० धावा केल्‍या आहेत. त्यानंतर सोळाव्या षटकांत श्रीलंकेला चौथा धक्का बसला. आदिल रशीदने निसांकाला ६७ धावांवर आउट केले.

अठराव्या षटकांच्या शेवटच्या चेंडूवर मार्क वूडने दसून शनाकाला झेलबाद केले. विकेटच्या मागे जोस बटलरने हा झेल टिपला. शनाका केवळ ३ धावा काढून माघारी परतला. अखेरच्या षटकात वूडने श्रीलंकेला आणखी एक धक्का देत भानुका राजपक्षेची विकेट घेतली. याच षटकात हसरंगा ९ धावांवर धावचीत झाला.यानंतर डावाच्‍या अखेरच्‍या चेंडूवर इंग्‍लंडच्‍या  वूडने चमिका करुणारत्नेला बाद केले.  श्रीलंकेने
पथुम निसांकाच्या ६७ (4५ चेंडू), कुसल मेंडिस १८ (14 चेंडू) आणि भानुका राजपक्षे २२ (22 चेंडू) धावांच्या जोरावर ८ गडी गमावत १४१ धावा केल्‍या आहेत. आता सेमीफायनलमध्‍ये धडक मारण्‍यासाठी इंग्‍लंडला १४२ धावा कराव्‍या लागणार आहेत.

इंग्‍लंडच्या गोलंदाजांचे 'कमबॅक'

१३ व्‍या षटकात श्रीलंका संघाने ३ गडी गमावत १०० धावा केल्‍या हाोत्‍या. त्‍यामुळे अखेरच्‍या सात षटकांमध्‍ये श्रीलंका दमदार फलंदाजी करत इंग्‍लंडसमाोर माोठ्या धावांचे आव्‍हान ठेवेल, असे मानले जात हाोते. मात्र, इंग्‍लंडच्‍या गाोलंदाजाीन कॅमबॅक केले. मार्क वुडने चार षटकांमध्‍ये २६ धावा देत ३ बळी घेतले. तसेच आदिल रशीद याने ४ षटकामध्‍ये १ विकेट घेत १६ धावा दिल्‍या. तसेच अन्‍य गाोलंदाजांनीही धावांची गती कमी केली. इंग्‍लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने ३, बेन स्टोक्स, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद यांनी प्रत्‍येकी एक विकेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news