

कर्करोगाचे नियंत्रण करण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे महत्त्वाचे असते. अंडाशयाचा कर्करोग (ओव्हेरियन कॅन्सर) हा जगभरातील महिलांना प्रभावित करणार्या सर्वात घातक कर्करोगांपैकी एक आहे. त्याची चिन्हे आणि लक्षणे वेळीच ओळखून त्वरित उपचार करणे महत्त्वाचे आहे.
अंडाशयाचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा अंडाशयातील कर्करोगाच्या पेशी वाढू लागतात आणि हळूहळू पसरतात. या प्रक्रियेमुळे कर्करोगाची गाठ तयार होते. ही कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना होऊ शकते; परंतु 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये याचे जास्त निदान केले जाते.
गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे
– ओटीपोट दुखणे, फुगणे किंवा सूज येणे: महिलांना ओटीपोट सतत फुगल्यासारखे वाटणे किंवा सूज येऊ शकते आणि त्यामुळे बहुतेकदा अस्वस्थ वाटू शकते.
– लवकर पोट भरणे : हे लक्षण सामान्यतः अंडाशयाचा कर्करोगाशी संबंधित आहे आणि यात भूक न लागणे किंवा लवकर तृप्त होणे अशी लक्षणे दिसून येतात.
– ओटीपोटात दुखणे : ओटीपोटात तीव्र वेदना होतात ज्या मासिक पाळी किंवा पचन समस्यांशी संबंधित नसतात. यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक ठरते.
– आतड्याच्या कार्यात बदल: अंडाशयाचा कर्करोगामुळे आतड्याच्या कार्यात बदल होऊ शकतो, जसे की बद्धकोष्ठता, अतिसार किंवा सतत शौचास जावे लागणे.
– वारंवार लघवी होणे : स्त्रियांना सतत लघवीची भावना निर्माण होते. विशेषतः ती कायम राहिली आणि मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे होत नसली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
– अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे : अचानक वजन कमी होणे, हे अंडाशयाच्या कर्करोगासह अंतर्गत आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.
– थकवा : सततचा थकवा किंवा दैनंदिन कामात व्यत्यय आणणारी कमी ऊर्जा ही अंडाशयाच्या कर्करोगाचा संकेत देऊ शकते.
– पाठदुखी : अंडाशयाच्या कर्करोगामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना जाणवतात, ज्याला सौम्य पाठदुखी म्हटले जाते.
वेळीच तपासणीचे महत्त्व :
अंडाशयाचा कर्करोगाची वेळीच तपासणी केल्याने त्वरित उपचार करता येतात.
प्रतिबंधात्मक उपाय
अंडाशयाचा कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करता येऊ शकते.
– वजन नियंत्रणात ठेवा आणि नियमित व्यायाम करा.
– गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा, ज्यामुळे अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
– अंडाशयाचा किंवा स्तनाचा कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यास आनुवंशिक समुपदेशनाचा पर्याय निवडा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने वैद्यकीय चाचणी करा.
– नियमित तपासणी करावी आणि वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.