Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सीलबंद पॅकेटमध्ये आढळल्या संशास्पद गोष्टी; घातपात घडवण्याचा पाकचा कट?

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सीलबंद पॅकेटमध्ये आढळल्या संशास्पद गोष्टी; घातपात घडवण्याचा पाकचा कट?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात सीलबंद संशयास्पद पॅकेट सापडल्याने खळबळ उडाली. विजयपूरमधील एका शेतात हे संशयास्पद पॅकेट सापडले आहे. यानंतर स्थानिक पोलिसांनी बॉम्ब निकामी पथकाला घटनास्थळी पाचारण केले. हे पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये धक्कादायक गोष्टी असल्याचे समोर आले आहे. हा पाकिस्तानचा घातपात घडवण्याचा डाव असल्याचा संशयही पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे.

संशयास्पद असलेले हे सीलबंद पॅकेट उघडल्यानंतर यामध्ये भारतीय चलनातील ५ लाख रुपये, २ चायनीज पिस्तूल, 4 मॅगझिन्स, ६० बंदुकीतील गोळ्या, डिटोनेटर आणि २ आईडी असे साहित्य सापडल्याची माहिती सांबाचे पोलिस अधिकारी अभिषेक महाजन यांनी दिली आहे. हे सीलबंद पॅकेट ड्रोनमधून टाकण्यात आले असल्याची शक्यताही वर्तवली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचेही महाजन सांगितले आहे.

अतिरिक्त एसपी सुरिंदर चौधरी यांनी सांगितले की, विजयपूरमधील सावंखा मोरपासून काही अंतरावर एका शेतात एक पॅकेट सापडल्याची माहिती सूत्रांना मिळाली होती. घटनास्थळी पाकीट उघडले असता त्यामध्ये धक्कादायक वस्तू आढळून आल्या आहेत. आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, असेही ते म्हणाले.

याआधी बुधवारी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक गावांमध्ये शोधमोहीम राबवली. सीमेपलीकडून नुकत्याच झालेल्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर एसओजी, केंद्रीय राखीव पोलीस दलाने सीमा भागात जवळपास तीन तासांची शोध मोहीम सुरू केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news