

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर करुनही ऐनवेळी माघार घेतल्याने आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता त्यांचे पूत्र सत्यजित तांबे यांच्यावरही निलंबन कारवाईची टांगती तलवार आहे.
सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. दरम्यान सत्यजीत तांबे यांचे निलंबन करण्यात यावे अशी शिफारस शिस्तपालन समितीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसकडे केली आहे. त्यानुसार कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीने सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीला दिल्या आहेत, असे सूत्रांकडून समजते. कॉंग्रेस हायकमांड सत्यजीत तांबे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे.