पुढारी ऑनलाईन डेस्क : इश्कबाज फेम अभिनेत्री सुरभि चंदनाने तिचा लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड करण शर्मा सोबत सात फेरे घेतले. २ मार्चला (Surbhi Chandna) ती विवाह बंधनात अडकल्याची माहिती समोर आली आहे. तिने इन्स्टावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. जयपूरच्या चोमू पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करताना ही तारीख लिहिली आहे – 02.03.2024 (Surbhi Chandna)
सुरभिने शाही अंदाजात लग्न केले. आतापर्यंतच्या अभिनेत्रीचे सर्व फंक्शन आणि फोटो – व्हिडिओज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सुरभिने देखील इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअऱ केले आङेत. ती इश्कबाज मालिकेतून लोकप्रिय झाली. त्याआधी ती नागिन मालिकेत दिसली होती.

सुरभिने फोटो शेअर करताना लिहिले- १३ वर्षांनंतर घर, आमच्या नव्या प्रवासासाठी सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हवा आहे.
सुरभिने आपला लॉन्गटाईम बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लग्न केले. ते एखमेकांना १३ वर्षांपासून डेट करत होते. इन्स्टाग्रामवर सर्व फोटोंमध्ये सुरभि सिंदूर लावलेली दिसते. सात फेरे, वरमाला सिंदूर कार्यक्रमापर्यंतचे सर्व फोटो तिने शेअर केले आहेत. एका फोटोत करण लव लेडीला मंगळसूत्र घालताना दिसत आहे.