

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुचर्चित असलेला शो म्हणजे बिग बॉस ! लवकरच बिग बॉस बिग ओटीटी सीझन 2 येणार असून सगळेच या साठी उत्सुक आहेत. यात एक हटके ट्विस्ट म्हणजे बिग बॉस ओटीटीमध्ये 2 मध्ये (Big Boss OTT Season 2) सनी लिओनी दिसणार असल्याचा चर्चा सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत आणि आता प्रेक्षकांना नेमका प्रश्न पडला की ती स्पर्धक आहे की सनी फक्त लाँच एपिसोडमध्ये दिसणार? (Big Boss OTT Season 2)
या मोठ्या बातमीबद्दल सनी लिओनीच्या जवळच्या एका स्रोताने खुलासा केला आहे. "सनी लिओनी बिग बॉस ओटीटी सेटवर आहे. कारण ती लॉन्च एपिसोडला उपस्थित राहणार आहे. ती स्पर्धक म्हणून यात सहभागी होणार नसून लाँचसाठी सनी खास पाहुणी असणार आहे."
सनी लिओनी सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि त्यानंतर सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या केनेडी चित्रपटाच्या उल्लेखनीय यशामुळे चर्चेत आहे. तिच्या चार्ली या पात्राला जागतिक प्रेक्षकांकडून मिळणार प्रेम उल्लेखनीय आहे. सनी अनेक नवे प्रोजेक्ट देखील करणार असल्याच्या चर्चा आहेत.