sunny leone
sunny leone

Mera Piya Ghar Aaya 2.0 : माधुरी दीक्षितच्या गाण्यात सनी लिओनीचे ठुमके (Video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनी सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असताना ती आता एक नवा कोरा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. तिच्या कामाच्या चर्चा सर्वत्र असताना ती एक अफलातून गाणं घेऊन येणार असल्याचं समजतंय. बॉलीवूड रसिकांना एक रोमांचक आणि आनंददायक परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा या स्रोताने हे उघड केले की, माधुरी दीक्षितने एकेकाळी सादर केलेला प्रसिद्ध डान्स नंबर पुन्हा तयार करण्यासाठी सनी लिओनी तयार झाली आहे. Mera Piya Ghar Aaya 2.0 या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हे गाणे ८ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. हे गाणे दुसरे तिसरे कोणी नसून "मेरा पिया घर आया" आहे, जे मूळत: १९९५ रोजी रिलीज झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट यारानामध्ये हिट ठरले होते. (Mera Piya Ghar Aaya 2.0 )

संबंधित बातम्या-

ज्याला बॉलीवूडच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिलं. आता हे गुपित उघड झाले आहे की माधुरी आणि सनी या दोघांच्याही चाहत्यांसाठी हा नॉस्टॅल्जिया ठरणार आहे." मेरा पिया घर आया 2.0" या प्रतिष्ठित गाण्यात तिच्या अप्रतिम नृत्य सादरीकरणाने सनी तिच्या चाहत्यांना मोहित करणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी हा डान्स कोरिओग्राफ केला आहे.


या रिमेकच्या चर्चा सगळीकडे होत असताना आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news