

लंडन; वृत्तसंस्था : ब्रिटिश पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर 40 दिवसांनी लीज ट्रस यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. पक्षात त्यांच्याविरोधात बंडखोरीचा सूर निघत आहे. ट्रस यांना 24 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानपदावरून हटवले जाण्याची शक्यता असून, पक्षातील 100 सदस्य त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त 'डेली मेल'ने दिले आहे. (British Prime Minister)
याबाबतचा निर्णय सत्तारूढ कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष घेणार आहे. त्यामुळे आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनाक यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याची गरज आहे. ट्रस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. ट्रस जनतेवर आपली छाप पाडण्यात अपयशी ठरल्या आहेत. ट्रस सरकारच्या मिनी बजेटवरही सर्वच स्तरांतून टीका करण्यात आली. अर्थमंत्री क्वासी यांना पदावरून दूर केल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला असल्याचे पक्षाच्या खासदारांनी म्हटले आहे. त्यामुळे ट्रस यांनी नैतिक जबाबदारी घेऊन पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे, या मागणीला जोर वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत ब्रिटिश पौंड खूपच घसरला आहे. इंधन दरवाढीमुळे ट्रस सरकारविरोधात मध्यमवर्गीयांमध्ये रोष आहे. ट्रस सरकार आर्थिक मोर्चावर पूर्णपणे अपयशी ठरल्याने ट्रस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. (British Prime Minister)
आर्थिक धोरणांबाबत सुनाक यांचा चांगला अभ्यास आहे. ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची क्षमता केवळ सुनक यांच्यातच आहे. त्यामुळे ब्रिटिश पंतप्रधानपदाची जबाबदारी सुनाक यांना दिल्यास ते सक्षमपणे सांभाळू शकतात, असे पक्षाच्या बहुतांश खासदारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा