

कराड : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आज (सोमवार) कराड दौऱ्यावर आले आहेत. कालच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील काही दिग्गज नेत्यांना बरोबर घेऊन सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आज शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते कराडमध्ये दाखल झाले आहेत.
त्यांच्या बरोबरच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांसह नेते पदाधिकारी यांनी प्रीतीसंगमावर शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटी नंतर शरद पवारांनी आज दुसऱ्याच दिवशी कराडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शरद पवारांना भेटण्यासाठी व पाठिंबा दर्शवण्यासाठी कार्यकर्त्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती.
कार्यकर्त्यांना आवरणे पोलीस व सुरक्षा रक्षकांना अवघड झाले होते. राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले असले तरी आलेला प्रत्येक जण साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत होता. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी प्रीतीसंगम घाटाचा परिसर दणाणून गेला.
हेही वाचा :